Asia Cup 2022: जडेजा संघाबाहेर गेल्याने पाकिस्तानचा संघ खूश? 4 सप्टेंबरला IND vs PAK पुन्हा एकदा भिडणार?

भारतीय संघ 4 सप्टेंबरला पहिला सामना खेळणार आहे. रविवारी टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होऊ शकतो. मात्र आज पाकिस्तानला हाँगकाँगचा पराभव करावा लागणार आहे.

Photo Credit - File

यूएईमध्ये आशिया चषक (Asia Cup 2022) खेळणाऱ्या टीम इंडियाला (Team India) स्पर्धेच्या मध्यातच मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. रवींद्र जडेजाने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध चांगला खेळ केला, त्याने 29 चेंडूत 35 धावा केल्या. आता डावखुरा फिरकी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचा (Akshar Patel) या स्पर्धेत त्याच्या जागी संघात समावेश करण्यात आला आहे. आशिया कप 2022 मध्ये हाँगकाँगचा पराभव करून भारतीय संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. सुपर 4 मध्ये भारताला तीन सामने खेळायचे आहेत. भारतीय संघ 4 सप्टेंबरला पहिला सामना खेळणार आहे. रविवारी टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होऊ शकतो. मात्र आज पाकिस्तानला हाँगकाँगचा पराभव करावा लागणार आहे. जर पाकिस्तानच्या संघाने साखळी फेरीत हाँगकाँगचा पराभव केला तर सुपर 4 मधील पहिला सामना भारताविरुद्ध होईल. (हे देखील वाचा: SL vs BNG: आशिया कपमधून बाहेर झाल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिबने केलं मोठं वक्तव्य, जाणून घ्या काय म्हणाला तो)

आशिया कप 2022 च्या सुपर 4 मधील टीम इंडियाचा सामना

4 सप्टेंबर: रविवार: A1 वि A2: भारत वि पाकिस्तान/ हाँगकाँग

6 सप्टेंबर: मंगळवार: A1 विरुद्ध B1: भारत विरुद्ध अफगाणिस्तान

8 सप्टेंबर: गुरुवार: A1 वि B2: भारत विरुद्ध श्रीलंका

जडेजा संघाबाहेर गेल्याने पाकिस्तानचा संघ खूश?

रवींद्र जडेजाची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी पाहता, पाकिस्तानी संघाला त्याला बाहेर पाहून आनंद वाटेल कारण त्याने भारताला शेवटचा सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्या सामन्यात जडेजावर विसंबून रोहित शर्माने त्याला वरच्या क्रमाने फलंदाजीसाठी पाठवले, जडेजानेही आपला विश्वास खरा ठरवला. मात्र, अक्षर पटेलही चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने जडेजाच्या बाहेर पडल्याने पाकिस्तानला फारसा दिलासा मिळणार नाही. आता अक्षर पटेलला संघ इलेव्हनमध्ये स्थान मिळते की नाही हे पाहावे लागेल.