कोरोनाच्या भीतीमुळे स्लिप लावणार नाही? ICC च्या नव्या मार्गदर्शक सूचनांवर इरफान पठाण ने घेतला आक्षेप
या मार्गदर्शक तत्त्वांचे काही सदस्यांनी कौतुक केले आहे, तर काही सदस्यांनी या नियमांच्या लागूतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी भारतीय खेळाडू इरफान पठाण याने आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संसर्गाचा धोका लक्षात घेता आयसीसी (ICC) क्रिकेट समितीने गेल्या सोमवारी बैठक घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कोरोनानंतर जागतिक क्रिकेट पुन्हा एकदा सुरु झाल्यावर पूर्णपणे भिन्न चित्र पाहायला मिळेल असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. कोविड-19 चा उद्रेक रोखण्यासाठी आयसीसीने नजीकच्या भविष्यात क्रिकेट पुन्हा सुरू झाल्यावर खेळाडूंना काही मार्गदर्शक सूचना पाळाव्या लागणार आहे. आयसीसीच्या ‘बॅक टू क्रिकेट’ या मार्गदर्शक सूचनांनुसार खेळाडूंना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी 14-दिवसाच्या प्री-मॅच आयसोलेशन प्रशिक्षण शिबिराचे पालन करणे आवश्यक असेल. खेळात स्वच्छता आणण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांचे काही सदस्यांनी कौतुक केले आहे, तर काही सदस्यांनी या नियमांच्या लागूतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी भारतीय खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) याने आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. इरफान म्हणालायात वादच नाही की सुरक्षिततेला प्राधान्य द्यायला हवे, पण त्याचसोबत खेळदेखील फार गुंतागुंतीचा करून ठेवता कामा नये. प्रत्येक वेळी जर खेळाडूला चेंडूला स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ करावे लागणार असतील, तर क्रिकेट खेळणं खूपच कठीण होऊन बसेल. (कोरोना दरम्यान इंग्लंडमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळत प्रेक्षकांना अनुमती देण्याच्या समर्थानात ओल्ड ट्रॅफर्ड, इतक्या प्रेक्षकांसमोर मॅच आयोजित करण्यास तयार)
मार्गदर्शक सूचनांवर आपली चिंता व्यक्त करताना इरफान म्हणाले की, क्रिकेटसारख्या संघ खेळात सामाजिक अंतर पाळणे हे सर्व खेळाडूंसाठी त्रासदायक काम ठरेल. “वैयक्तिक खेळांमध्ये सोशल डिन्स्टन्सिंग हा प्रकार शक्य आहे, पण क्रिकेट किंवा फुटबॉलसारख्या सांघिक खेळांमध्ये शक्य नाही. खेळा दरम्यान जर तुम्हाला विकेट किपरच्या बाजूला स्लीपचा फिल्डर हवा असेल, तर तुम्ही तो फिल्डर ठेवणार नाही का? त्याचसोबत प्रत्येक संघातील खेळाडूंना 14 दिवसांचा क्वारंटाइन काळ असेल असा नियम आहे. त्यात कोणी करोना पॉझिटिव्ह सापडला, तर त्याला क्रिकेटपासून दूर ठेवलं जाईल. पण क्वारंटाइननंतर केवळ तंदुरूस्त खेळाडूच मैदानात उतरणार आहेत. अशा वेळी जर मैदानावरही नियम ठेवण्यात येत असतील, तर क्वारंटाइन कालावधीचा काय उपयोग?” असे इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार इरफान म्हणाला.
आयसीसीने जारी केलेल्या काही मार्गदर्शक सूचनांमध्ये बॉलच्या संपर्कात आल्यानंतर हात स्वच्छ करणे, प्रशिक्षण घेताना लू किंवा शॉवर ब्रेक नाही, खेळाच्या आधी आणि नंतर चेंजिंग रूम कमी वेळ घालवणे, बॉलवर लाळ न वापरणे आणि खेळ दरम्यान वैयक्तिक वस्तू न सोपविणे अशा काही नियमांचा उल्लेख केला आहे.