Ireland vs South Africa, 1st T20I: पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर देण्यासाठी आयर्लंड सज्ज; पाहा दोन्ही संघाचे हेड टू हेड रिकॉर्ड
दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण पाच T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या मधील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सर्व सामने जिंकले आहेत.
South Africa National Cricket Team vs Ireland National Cricket Team: आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला T20 सामना आज म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. उभय संघांमधील हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजल्यापासून खेळवला जाईल. मालिकेतील दुसरा सामना 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. हे दोन्ही सामने अबुधाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. पहिल्या T20 सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होऊ शकते. (हेही वाचा - Sri Lanka vs New Zealand, 2nd Test Day 2 Video Highights: दुसऱ्या दिवशी इंग्लंडला दोन धक्के; श्रीलंकेची दुसऱ्या सामन्यावर घट्ट पकड, पाहा सामन्याची हायलाइट्स एका क्लिकवर)
टी-20 मालिका संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने अबुधाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी ही मालिका सोपी नसेल. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला यूएईमध्ये अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. अफगाणिस्तानने मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-1 असा पराभव केला.
दोन्ही संघामधील हेड टू हेड रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण पाच T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या मधील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सर्व सामने जिंकले आहेत. या मालिकेत आयर्लंडला पहिला विजय मिळवायचा आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
आयर्लंड: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), रॉस अडायर, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलेनी, कर्टिस कॅम्फर, मार्क अडायर, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, क्रेग यंग, बेन व्हाइट.
दक्षिण आफ्रिका: एडन मार्कराम (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रायन रिक्लेटन (यष्टीरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, जेसन स्मिथ, विआन मुल्डर, अँडिले सिमेलेन, ब्योर्न फॉर्च्यून, लुंगी एनगिडी, ओटेनिल बार्टमन, लिझाद विल्यम्स.
(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 9441 05:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

