IPL 2021: आयपीएल मधून खेळाडूंची कोरोनामुळे माघार, रविचंद्रन अश्विन नंतर 'हे' क्रिकेटपटू सामन्यांमधून पडले बाहेर

भारतातील अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनसह काही ऑस्ट्रेलियाई खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल 2021 ट्रॉफी (Photo Credit: Instagram/iplt20)

IPL 2021: भारतात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे आयपीएल मधील खेळाडू सुद्धा चिंतेत पडले आहेत. भारतातील अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनसह काही ऑस्ट्रेलियाई खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यावर बीसीसीआयने असे म्हटले आहे की, आयपीएल तर सुरुच राहणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या अश्विनने सरराइजर्स हैदराबाद यांच्या विरोधातील रविवारी सामना जिंकल्यानंतर एक ट्विट केले आहे. त्यात असे म्हटले आहे , मी आयपीएलमधून ब्रेक घेत आहे. माझ्या परिवारातील सदस्य कोरोनासोबत लढत आहे. त्यामुळे या कठीण काळात त्यांना माझ्या मदतीची गरज आहे. पुढे त्याने असे ही म्हटले की, जर परिस्थिती योग्य दिशेने जात असल्यास मी परत येईन. धन्यवाद दिल्ली कॅपिटल्स. यावरुन असे कळते की अश्विन याच्या परिवारातील सदस्यांपैकी कोणाला तरी कोरोनाची लागण झाली आहे.

तसेच ऑस्ट्रेलिया आणि राजस्थान रॉयल्स मधील वेगवान गोलंदाज एंड्रयू टाई याने सुद्धा भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्या देशात परतण्यावर बंदी असल्याने आयपीएल मध्येच सोडली आहे. असा दावा केला आहे की, ऑस्ट्रेलियातील काही क्रिकेटपटू सुद्धा असा निर्णय घेऊ शकतात. तर रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु मधील केन रिचर्डसन आणि एडम जाम्पा यांनी खासगी कारणामुळे लीग सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या आयपीएलचे सामने हे प्रेक्षाकांशिवाय खेळवले जात आहेत.(IPL 2021 Purple Cap Updated: RCB च्या हर्षल पटेलचं पर्पल कॅपवर वर्चस्व, टॉप-5 गोलंदाजांमध्ये रोचक बनली रेस)

बीसीसीआयने PTI ला सांगितले की, लीग सुरुच राहणार आहे. त्यामुळे ज्याला आयपीएल सोडून जायचे असल्यास त्यामध्ये काहीच समस्या नाही. तर एडम जाम्पा आमि केन रिचर्डसन खासगी कारणामुळे मायदेशी परतत आहेत. त्यामुळे ते अन्य सामन्यांमध्ये खेळणार नाहीत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पूर्णपणे त्यांच्यासोबत असून प्रत्येक पद्धतीने त्यांची मदत करत आहे. लेग स्पिनर जाम्पा याला दीड कोटी आणि रिचर्डसन याला चार कोटी रुपयांत खरेदी करण्यात आले होते.(IPL 2021 Points Table Updated: 'सुपर संडे'नंतर गुणतालिकेत फेरबदल; CSK, DC संघाची भरारी तर RCB ची घसरण)

ब्रिटेन आणि न्यूझीलँडसह अन्य काही देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाने सुद्धा 30 टक्के कपात केली असून पुढे बंदी घालणार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून दरदिवशी तीन लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. ऑक्सिजन आणि काही महत्वाची औषधे यांचा तुटवडा भासत असल्याने आरोग्य विभागावर मोठा ताण आला आहे. त्यामुळे रॉयल्स मधील लियाम लिविंगस्टोन सुद्धा प्रवासावर बंदी येण्यापूर्वी ब्रिटेनला परतला आहे.