IPL Auction 2022: आयपीएल 15 होणार दमदार; 10 पैकी 7 संघांचे कर्णधारांच्या नावावर शिक्कामोर्तब, 3 फ्रँचायझी नवीन चेहऱ्यांच्या शोधात
12 आणि 13 फेब्रुवारी रोजी देश-विदेशातील तब्बल 590 खेळाडूंवर बोली लावली जाईल. अनेक संघ अजूनही आपल्या कर्णधाराच्या शोधात आहेत. केकेआर, आरसीबी आणि पंजाब किंग्सचे संघ त्यांच्या नवीन कर्णधाराच्या शोधात आहेत तर उर्वरित संघांनी जवळपास निश्चित कर्णधाराची निवड केली आहे.
IPL Auction 2022: यावर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावात (Indian Premier League) एकूण 10 फ्रँचायझी भाग घेणार आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी देश-विदेशातील तब्बल 590 खेळाडूंवर बोली लावली जाईल. या लिलावात एकूण 370 भारतीय खेळाडू आणि 220 परदेशी क्रिकेटपटू सहभागी होणार असून, त्यापैकी 48 खेळाडूंनी 2 कोटी रुपयांची मूळ किंमत ठेवली आहे. खेळाडूंच्या लिलावासाठी स्टेज सजवण्यापूर्वी संघ रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. आयपीएलने (IPL) या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत अनेक संघ अजूनही आपल्या कर्णधाराच्या शोधात आहेत. केकेआर (KKR), आरसीबी (RCB) आणि पंजाब किंग्सचे संघ त्यांच्या नवीन कर्णधाराच्या शोधात आहेत तर उर्वरित संघांनी जवळपास निश्चित कर्णधाराची निवड केली आहे.
रोहित शर्मा, एमएस धोनीच्या हाती असणार मुंबई आणि चेन्नईची कमान
रोहित शर्मा (Rohit Sharma0 मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार असेल. कारण तो आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. आयपीएलची पाच वेळची चॅम्पियन मुंबई यावेळी देखील रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळेल. रोहित शर्मा 2013 पासून मुंबईचे नेतृत्व करत आहे आणि त्याच्या नेतृत्वात त्याने पाच वेळा मुंबई आयपीएल चॅम्पियन बनला आहे. दुसरीकडे, आयपीएल 2021 चॅम्पियन चेन्नई सुपर (Chennai Super Kings) किंग्स देखील पुन्हा एकदा एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात मैदानात उतरेल. धोनी आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून चेन्नईची धुरा सांभाळत आहे. धोनीच्या नेतृत्वात CSK ने 4 वेळा आयपीएल ट्रॉफी काबीज केली आहे. त्यामुळे सीएसकेचे विजयी संयोजन बनवण्यात धोनी महत्त्वाची भूमिका बजावेल.
कोणत्या संघाचा कोण असेल कर्णधार
आयपीएलच्या पहिल्या सीजनचे विजेता राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा युवा संजू सॅमसनकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. गेल्या वर्षी संघाने सॅमसनला आपला कर्णधार बनवले होते, पण संघाला फारसा फरक पडत आला नाही. तर सनरायझर्स हैदराबाद संघाची कमान केन विल्यमसनच्या हाती सोपवण्यास सज्ज आहे. हैदराबादने विल्यमसनला 14 कोटींसाठी रिटेन केले आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सने युवा रिषभ पंतवर पुन्हा विश्वास दाखवेला आहे. दुसरीकडे, कोलकता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आपल्या नवीन कर्णधाराच्या शोधात असून लिलावानंतर त्यांची प्रतीक्षा देखील संपुष्टात येईल.