IPL 2025: 'कोणत्याही मोठ्या नियमात बदल न करता 21 मार्चपासून आयपीएल सुरू'; इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांची माहिती
आयपीएलचा हंगाम मार्चमध्ये सुरू होईल. 21 मार्च ही वेळ निश्चित केली आहे. वेळापत्रक येत्या काही दिवसांत जाहीर केले जाईल.
IPL 2025: इंडियन प्रीमियर लीगची 2025 (Indian Premier League 2025) आवृत्ती 21 मार्चपासून सुरू होईल. इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे अध्यक्ष अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. नोव्हेंबरमध्ये जेद्दाह, सौदी अरेबिया येथे आयपीएलचा लीलाव पार पडला. येत्या काही दिवसांत सर्व सामन्यांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल. "आयपीएलचा हंगाम मार्चमध्ये सुरू होईल. 21 मार्च ही वेळ निश्चित केली आहे आणि वेळापत्रक येत्या काही दिवसांत जाहीर केले जाईल," याबाबतची माहिती धुमाळ यांनी दिली. त्याशिवाय, आयपीएलच्या नियमांमध्ये कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. (IND-W vs SCO-W Women's U19 T20 World Cup 2025 Match Live Streaming: भारत विरुद्ध स्कॉटलंड सामना कधी, कुठे पहाल?)
'बिलासपूरमध्ये अनेक राष्ट्रीय सामने आयोजित केले जात आहेत. पुढच्या वेळी रणजी करंडक, दुलीप करंडक, विजय हजारे ट्रॉफी, जे काही सामने खेळले जातील. धर्मशालालाही सामने मिळावेत, असा प्रयत्न आहे. निश्चितपणे एक ऑफर मिळेल, मागील वेळी दोन होते', असे ते म्हणाले. संसद खेळ महाकुंभ'च्या तिसऱ्या आवृत्तीला सुरुवात झाली असून, सोमवारपासून बिलासपूर क्रिकेट स्टेडियमवर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. मार्चपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 45 संघ सहभागी होत आहेत.
ग्रामीण भागातील गुणवान खेळाडूंना वाव देण्यात आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात संसद खेळ महाकुंभ सातत्याने यशस्वी होत असल्याचे मत धुमाळ यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय खेळ आणि इतर उपक्रमांमध्ये उदयोन्मुख कलावंत ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात येत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
"देश पातळीवर पाहिल्यास जे काही टॅलेंट समोर येत आहे, ते गावातून येत आहे. जैस्वाल, रिंकू सिंग, इतर खेळाडू त्याची उदाहरणे आहेत. जिथे कुटुंबाकडून आधार मिळात नाही किंवा पार्श्वभूमी नाही, पण ते त्यांच्यातील प्रतिभा खेळाच्या मैदानात आणतात", असे अरुण धुमाळ यांनी म्हटले.
(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2025 11:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

