IPL 2022: शून्यातून शिखर गाठण्याची Virat Kohli याची तयारी सुरु, वेस्ट इंडिज दिग्गजकडून खास टिप्स घेताना कॅमेऱ्याने टिपला फोटो

विराट कोहली सध्या IPL मधील सर्वात खराब फॉर्ममधून जात आहे. कोहली आयपीएल कारकिर्दीत प्रथमच एका मोसमात पहिल्याच बॉलवर दोनदा शून्यावर बाद झाला. खराब फॉर्मशी झगडत विराट कोहली सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतर वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज आणि विद्यमान SRH फलंदाजी प्रशिक्षक ब्रायन लारा यांच्या आश्रयात आला. कोहली या महान खेळाडूकडून खास टिप्स घेताना दिसला.

IPL 2022: शून्यातून शिखर गाठण्याची Virat Kohli याची तयारी सुरु, वेस्ट इंडिज दिग्गजकडून खास टिप्स घेताना कॅमेऱ्याने टिपला फोटो
विराट कोहली - ब्रायन लाराची भेट (Photo Credit: Twitter/RCBTweets)

IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्या आयपीएल (IPL) सामन्यानंतर आरसीबीचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) SRH प्रशिक्षक आणि वेस्ट इंडिज दिग्गज ब्रायन लारा  (Brian Lara) यांची भेट घेतली. गोल्डन डकवर पडलेला कोहली, सनरायझर्सच्या फलंदाजी प्रशिक्षकासोबत बटिंगच्या टिप्स, क्रिकेटवर चर्चा करताना दिसत होता. त्यांच्या संवादाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2022 05:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).