IPL 2022: भारताचा ‘हा’ तुफानी क्रिकेटपटू IPL मध्ये घालतोय धुमाकूळ, गेल्या 10 वर्षात खेळलाय 7 मूठभर T20 सामने
इंडियन प्रीमियर लीग 15 मधील या खेळाडूची आश्चर्यकारक कामगिरी पाहून असे वाटते की लवकरच हा क्रिकेटपटू भारताच्या वनडे आणि टी-20 संघातही पुनरागमन करेल. 2012 मध्ये टी-20 पदार्पण केलेल्या भारताचा स्टार वेगवान गोलंदाज उमेश यादवने मूठभर असे 7 सामने खेळले आणि 9 गडी बाद केले.
IPL 2022 मध्ये भारतीय संघाचा (Indian Team) एक धाकड क्रिकेटपटू सध्या आल्या भेदक गोलंदाजीने कहर करत आहे. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 मधील या खेळाडूची आश्चर्यकारक कामगिरी पाहून असे वाटते की लवकरच हा क्रिकेटपटू भारताच्या वनडे आणि टी-20 संघातही पुनरागमन करेल. हा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पेक्षाही धोकादायक आहे, जो सर्वात मोठा फलंदाजी क्रम उद्ध्वस्त करू शकतो. हा गोलंदाज भारताच्या विरोधी संघांसाठी सर्वात मोठा काळ ठरू शकतो आणि भारतासाठी स्वबळावर सामना जिंकू शकतो. या खेळाडूने 2010 मध्ये वनडे आणि 2012 मध्ये टी-20 मध्ये पदार्पण केले. मात्र तो एकदिवसीय क्रिकेटच्या तुलनेत टी-20 मध्ये अधिक यशस्वी होऊ शकला नाही. (IPL 2022, MI vs KKR Match 14: उमेश यादव याचा रोहित शर्मा याला जोरदार ‘पंच’, मुंबईचा कर्णधार फक्त 3 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला)
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) सध्या आयपीएल 2022 मध्ये धुमाकूळ घालत आहे. यादवने या आयपीएल (IPL) मोसमात आतापर्यंत सर्वाधिक 9 विकेट घेतल्या असून त्याने पर्पल कॅपवर ताबा मिळवला आहे. उमेश सातत्याने 145 पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत असून त्याचा सामना करण्यात बड्या-बड्या फलंदाजांनाही अडचण होत आहे. उमेश यादव आयपीएलमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे, ते पाहता तो लवकरच पुन्हा एकदा भारताकडून एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकेल, असे दिसत आहे. उमेश यादवला सध्या फक्त कसोटी क्रिकेटमध्ये संधी देण्यात आली आहे. 2012 मध्ये टी-20 पदार्पण केलेल्या उमेशने मूठभर असे 7 सामने खेळले आणि 9 गडी बाद केले.
कोहली-शास्त्री यांच्या काळात उमेश यादवला फार कमी संधी मिळाल्या. कोहली-शास्त्री यांच्या संघ व्यवस्थापनाने मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना सर्वाधिक संधी दिली, ज्यामुळे यादवला बाहेर बसने भाग पडले. उमेश आधी एकदिवसीय आणि नंतर टी-20 संघातून बाहेर पडला. त्याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा वनडे आणि 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला. 140-145 च्या वेगाने सातत्याने गोलंदाजी करताना उमेश यादव एक उत्तम रिव्हर्स स्विंग गोलंदाज आहे. त्यामुळे तो टीम इंडियासाठी आगामी विश्वचषकमध्ये सर्वात घातक शस्त्र ठरेल. सध्याच्या आयपीएलमध्ये उमेशने आपल्या रिव्हर्स स्विंग गोलंदाजीने विरोधी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे.