IPL 2022: ‘या’ 3 आयपीएल संघांच्या ताफ्यात सर्वात खतरनाक गोलंदाज, जे त्यांच्यासाठी बनतील विजेतेपदाची गुरुकिल्ली

IPL 2022: आयपीएलच्या 15 व्या हंगामाचे काउंटडाउन सुरु झाले आहे. आयपीएल सारखी स्पर्धा जिंकण्यासाठी आक्रमक फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजी आक्रमणाची भूमिका महत्त्वाची असते. यावर्षी आयपीएल 2022 मुंबई आणि पुणे येथे होणार असून तिथल्या खेळपट्ट्या नेहमीच फिरकीपटूंना उपयुक्त ठरल्या आहेत. अशा परिस्थितीत ज्या संघांचे गोलंदाजी आक्रमण मजबूत असेल, ती विजेतेपदाची प्रबळ दावेदार बनेल.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: Twitter/@IPL)

IPL 2022: आयपीएलच्या 15 व्या हंगामाचे काउंटडाउन सुरु झाले आहे. 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील सलामीच्या सामन्याने स्पर्धेचा ‘शुभारंभ’ होईल. आयपीएल (IPL) सारखी स्पर्धा जिंकण्यासाठी आक्रमक फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजी आक्रमणाची भूमिका महत्त्वाची असते. यावर्षी आयपीएल 2022 मुंबई आणि पुणे येथे होणार असून तिथल्या खेळपट्ट्या नेहमीच फिरकीपटूंना उपयुक्त ठरल्या आहेत. अशा परिस्थितीत ज्या संघांचे गोलंदाजी आक्रमण मजबूत असेल, ती विजेतेपदाची प्रबळ दावेदार बनेल. आयपीएलपूर्वी खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला जिथे फ्रँचायझींनी आपली ताकद आणखी मजबूत करण्यासाठी एका पेक्षा एक खेळाडूंवर बोली लावली. अशा परिस्थितीत 3 आयपीएल संघांमध्ये सर्वात धोकादायक गोलंदाज आहेत, जे कोणत्याही विरोधी संघाचा फलंदाजीक्रम ध्वस्त करू शकतात. (IPL 2022: अरेरे! डझनभर परदेशी स्टार खेळाडू आयपीएल 2022 च्या पहिल्या आठवड्याला मुकणार, पहा फ्रेंचायझीनुसार खेळाडूंची यादी)

1. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

आयपीएल मुंबई लिलावापूर्वी इंडियन्सकडे जसप्रीत बुमराहच्या रूपाने घातक गोलंदाज रिटेन केले आहे. पण मुंबईने ट्रेंट बोल्ट याला बाहेर केले असून बोल्टऐवजी त्यांनी आपल्या संघ इंग्लंड स्फोटक गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा समावेश केला आहे. तर जयदेव उनाडकट यालाही मुंबई इंडियन्सने खरेदी केले आहे. अशा परिस्थितीत हे त्रिकूट कोणत्याही विरोधी संघासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतात. पण आर्चर यंदाची स्पर्धा खेळणार नसल्यामुळे मुंबई बेसिल थंपी, डॅनियल सॅम्स यांच्यावर अवलंबून असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच-वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. आणि यावर्षी या गोलंदाजांच्या जोरावर मुंबई संघ विजयाचा षटकार मारण्याच्या निर्धारित असेल.

2. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)

भारतीय खेळपट्ट्या नेहमीच फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरल्या आहेत. इथे नेहमीच फिरकीपटूंचे वर्चस्व राहिले आहे. आयपीएलचे पहिले चॅम्पयन राजस्थान रॉयल्सने लिलावात सर्वोत्तम फिरकीपटू खरेदी केले आहेत. त्यांनी आपल्या संघात रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल यांचा समावेश केला आहे. हे दोघेही अवघ्या काही चेंडूंमध्ये सामना बदलून टाकण्यासाठी ओळखले जातात. तसेच त्यांची गुगली खेळणे कोणत्याची खेळाडूसाठी सोपे नाही. तर मुंबई इंडियन्ससाठी विजेतेपदाची निर्णायक भूमिका बजावलेल्या ट्रेंट बोल्ट याला राजस्थानने आपल्या ताफ्यात सामील केले आहे. तसेच टीम इंडियाचा नवा स्टार प्रसिद्ध कृष्णा देखील संघात समावेश केले आहे. अशा परिस्थितीत दमदार गोलंदाजांच्या जोरावर संघ आयपीएल 2022 चे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल.

3. चेन्नई सुपर किंग्स

चेन्नईने लिलावात त्यांचे अनेक जुने खेळाडू खरेदी केले आहे. तर दीपक चाहर याला सर्वाधिक किंमत देऊन पुन्हा संघात समाविष्ट केले आहे. जेव्हा जेव्हा करिष्माई कर्णधार एमएस धोनीला विकेटची गरज भासलीत त्याने दीपक कडे चेंडू सोपवला. विरोधी फलंदाजांसाठी त्याला खेळणे म्हणजे कठीणच. तसेच CSK ने अॅडम मिल आणि राजवर्धन हंगरगेकर यांचाही आपल्या संघात समावेश केला आहे. तुषार देशपांडे याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अतिशय चांगल्या गोलंदाजीचे उदाहरण मांडले आहे. अशा ताकदवर गोलंदाजीच्या जोरावर धोनीच्या नेतृत्वात चार वेळा आयपीएल चॅम्पियन CSK ची नजर पाचव्या ट्रॉफीवर कब्जा करण्याकडे असेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now