IPL 2022: ‘या’ पाच खेळाडूंचं राष्ट्रीय संघात खेळण्याचे स्वप्न होतंय धुसर, 15 व्या हंगामात खराब कामगिरीचा फटका बसण्याची शक्यता!
IPL 2022: आयपीएल सर्व भारतीय खेळाडूंसाठी जगातील सर्वात मोठ्या T20 लीगमध्ये त्यांची प्रतिभा दाखवण्याची मोठी संधी देते. पण दुर्दैवाने, खराब फॉर्ममुळे टीम इंडियात पुनरागमनाकडे डोळे लावून बसलेल्या अनेक खेळाडूंचे राष्ट्रीय संघात खेळण्याचे स्वप्न धुसर होत आहे. अनेक खेळाडूंनी ऑस्ट्रेलियात आगामी टी-20 विश्वचषक 2022 पूर्वी टीम इंडियात परतण्याच्या त्यांच्या संधी हातून गमावल्या आहेत.
गेल्या 14 मोसमात आयपीएल (IPL) हे अनेक देशांतर्गत खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची शिडी बनले आहे. इंडियन प्रीमियर टी-20 लीगमध्ये (Indian Premier League) अनेक खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करून भारतीय संघातच (Indian Team) नव्हे तर अनेक देशांच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी आपली लय मिळवण्याचे देखील एक व्यासपीठ बनले आहे. आयपीएल सर्व भारतीय खेळाडूंसाठी जगातील सर्वात मोठ्या T20 लीगमध्ये त्यांची प्रतिभा दाखवण्याची खूप मोठी संधी देते. पण दुर्दैवाने, खराब फॉर्ममुळे टीम इंडियात (Team India( पुनरागमनाकडे डोळे लावून बसलेल्या अनेक खेळाडूंचे राष्ट्रीय संघात खेळण्याचे स्वप्न धुसर होताना दिसत आहे. अनेक खेळाडूंनी ऑस्ट्रेलियात आगामी टी-20 विश्वचषक 2022 पूर्वी टीम इंडियात परतण्याच्या त्यांच्या संधी हातून गमावल्या आहेत. (IPL 2022: आधीच टीम इंडियातील स्थान टांगणीवर आता ‘या’ दिग्गज खेळाडूच्या IPL मधूनही पत्ता कट? 5 सामन्यानंतर संघाने बेंचवर बसला)
1. संजू सॅमसन Sanju Samson)
राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या आयपीएलमध्ये आपले सर्वोत्तम खेळ करत आहे, पण कर्णधार संजू सॅमसन सोबत असे घडत नाही. आगामी टी-20 विश्वचषकसाठी सॅमसनचा विचार केला जात असल्याचे स्वतः कर्णधार रोहित शर्माने काबुल केले होते. पण बॅटने खराबमुळे सॅमसन यष्टिरक्षकाच्या भूमिकेतून शर्यतीतून बाहेर पडला आहे. ऋषभ पंत पहिली निवड असून केएल राहुलचा एक बॅकअप पर्याय असेल. त्याने 8 सामन्यात 32.5 च्या सरासरीने 228 धावा केल्या ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
2. मनीष पांडे (Manish Pandey)
टीम इंडियाच्या मधल्या फळीत परतण्यासाठी लखनौ सुपर जायंट्सचा मनीष पांडे श्रेयस अय्यर, केएल राहुल यांच्या जवळपासही नाही. टीम इंडियात त्याचे दिवस संपल्याचे चित्र सध्या दिसत आहे. लखनौसाठी चांगली कामगिरी करून मनिषला भारतीय संघात स्थान मिळवण्याची संधी होती. मात्र, त्याला आतापर्यंत काही विशेष कामगिरी करता आलेली नाही. मनीषने 6 सामन्यात 14.67 च्या सरासरीने अवघ्या 88 धावा असून 38 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.
3. वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy)
UAE मधील टी-20 विश्वचषकात फ्लॉप झालेल्या वरुण चक्रवर्तीने आयपीएल 2022 मध्ये ऑस्ट्रेलियातील टी-20 स्पर्धेसाठी आपला विचार का केला जाऊ नये दाखवून दिले आहे. वरुणने 8 सामन्यात 61.75 च्या सरासरीने 4 बळी घेतले आहेत. तसेच कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या कामगिरीसमोर त्याची खेळी फिकटच ठरते.या हंगामात पर्पल कॅप शर्यतीत ‘कुलचा’ जोडी अव्वल स्थानावर आहे.
4. वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar)
प्रदीर्घ काळ दुखापतीने ग्रासलेला वॉशिंग्टन सुंदर सनरायझर्स हैदराबाद या नवीन फ्रँचायझीसाठी आपल्या कामगिरीचे समर्थन करण्यात अपयशी ठरला आहे. सुंदरने आपली नवीन फ्रँचायझी सनरायझर्सचीही बॅट आणि बॉलने निराशा केली. त्यामुळे आता त्याच्या टीम इंडियात पुनरागमनाची शकयता फारच कमी झाली आहे. सुंदरने आतापर्यंत 8 सामन्यात 61 धावा देऊन 4 बळी घेतले आहेत.
5. कृणाल पांड्या (Krunal Pandya)
मुंबई इंडियन्सने लिलावापूर्वी बाहेर केलेल्या अष्टपैलू कृणाल पांड्या कडून लखनौला मोठी आस होती. पण या धडाकेबाज अष्टपैलूने अद्याप आपल्याला साजेसा खेळ करता आलेला नाही. कृणाल सातत्याने बॅट आणि बॉलने योगदान देण्यात अपयशी ठरला आहे. RCB विरुद्ध 42 धावा ही कृणालची सर्वोत्तम कामगिरी असून बॉलसह त्याने मुंबईविरुद्ध 3/19 अशी आकडेवारीची नोंद केली आहे. तसेच त्याला टीम इंडियात परतण्यासाठी भाऊ हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि राहुल तेवतिया यांच्यासारख्या स्टार फिनिशर्स खेळाडूंकडून टक्कर मिळत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)