IPL 2022: कमाईत हिरो, कामगिरीत झिरो! आयपीएलमधील महागड्या खेळाडूची बॅट अद्यापही थंडच; फटक्यांची प्रतिक्षा कायम

अनेक युवा खेळाडूंनी आतापर्यंत उत्तम खेळ दाखवला, तर अनेक दिग्गज खेळाडूंची बॅट अजूनही शांत आहे. आम्ही येथे अशाच काही खेळाडूंबद्दल सांगत आहोत, ज्यांनी गेल्या सीझनमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे, परंतु या सीझनमध्ये त्यांची बॅट असा खेळ करू शकलेली नाही ज्यासाठी ते ओळखले जातात.

अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 चे आयोजन जसजसे पुढे जात आहे तसतसे सामने रोमांचक होत चालले आहेत. प्रत्येक संघाने किमान तीन सामने खेळले असून सर्व संघांच्या नजरा पॉइंट टेबलवर टिकून आहेत. अनेक युवा खेळाडूंनी आपल्या आतापर्यंतच्या कामगिरीच्या जोरावर छाप पाडली आहे, मात्र येत्या सामन्यांमध्ये त्यांनी चांगली कामगिरी करावी, कारण त्यांचे भविष्य ही याच्यावर टिकून असेल. अनेक युवा खेळाडूंनी आतापर्यंत उत्तम खेळ दाखवला, तर अनेक दिग्गज खेळाडूंची बॅट अजूनही शांत आहे. आम्ही येथे अशाच काही खेळाडूंबद्दल सांगत आहोत, ज्यांनी गेल्या सीझनमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे, परंतु या सीझनमध्ये आतापर्यंत त्यांची बॅट असा खेळ करू शकलेली नाही ज्यासाठी ते ओळखले जातात. (IPL 2022: ‘या’ भारतीय सुपरस्टार्सचा आयपीएलच्या सुरुवातीलाच संघर्ष, फ्रँचायझीच नव्हे तर चाहत्यांचाही होतोय अपेक्षा भंग)

1. रोहित शर्मा (Rohit Sharma)– 16 कोटी

रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनले आहे, पण या मोसमात संघ किंवा स्वतः रोहितची बॅट काहीही कमाल दाखवू शकलेली नाही. रोहितला फ्रँचायझीने 16 कोटी रुपये देऊन कायम ठेवले. रोहितने आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांच्या 5 डावात 108 धावा केल्या आहेत.

2. विराट कोहली (Virat Kohli) – 15 कोटी

कर्णधार पदावरून पायउतार होऊनही आरसीबीने (RCB) विराटला 15 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. कर्णधारपदाचा अतिरिक्त भार कमी झाल्यामुळे या मोसमात तो मोठी धावसंख्या करेल अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. पण आतापर्यंत तो त्या लयीत दिसला नाही. कोहलीने 5 डावात 107 धावा केल्या आहेत.

3. किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) – 6 कोटी

वेस्ट इंडीजच धाकड अष्टपैलू एक असा खेळाडू होता ज्यांच्यावर मुंबई इंडियन्स अनेक वर्षांपासून भरवसा दाखवत आली आहे. हार्दिक पांड्या, ईशान किशन यांच्यापेक्षा त्याला प्राधान्य देण्यात आले आणि रिटेन केले गेले. पण तो त्या भरवश्यावर खरा उतरू शकला नसून त्याने आतापर्यंत खेळलेल्या 8 डावात 57 धावाच केल्या आहेत.

4. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) – 1 कोटी

भारताचा दिग्गज कसोटी फलंदाज रहाणेला दिल्लीने रिलीज केल्यावर लिलावात कोणी बोली लावण्याची अपेक्षा कमीच केली गेली. पण केकेआरने (KKR) त्याला सलामीवीर म्हणून मूळ किमतीत खरेदी केले, मात्र रहाणे आतापर्यंत संघाच्या विजयात बॅटने फारसे योगदान देऊ शकलेला नाही. रहाणेने आतापर्यंत पाच सामन्यात फक्त 80 धावाच करू शकला आहे.

5. रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) – 6 कोटी

तीन वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) रिटेन केलेल्या चार खेळाडूंपैकी गायकवाड एक होता. गेल्या वर्षी चेन्नईच्या विजयी मोहिमेत रुतुराजने महत्तवपूर्ण योगदान दिले आणि ऑरेंज कॅप पटकावली होती. त्यामुळे या वर्षी त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. तथापि आतापर्यंत त्याने फक्त अपेक्षा भंगच केले आहे. रुतुराज CSK च्या गेल्या पाच सामन्यात केवळ 35 धावाच करू शकला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif