IPL 2022, RCB vs LSG Eliminator: आयपीएल 15 मध्ये बेंगलोर-लखनऊचे विजेतेपद जिंकणे कठीण! यामागचे सर्वात मोठे कारण काय? जाणून घ्या

या दोन संघांसाठी विजेतेपद मिळवणे सर्वात कठीण आहे. लखनऊ गुणतक्त्यात तिसऱ्या तर आरसीबी संघ चौथ्या स्थानावर राहिला होता.

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध आरसीबी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, RCB vs LSG Eliminator: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मध्ये 24 मे पासून प्लेऑफ सामने सुरू होत आहेत. प्लेऑफचा पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळला जात आहे. त्याच वेळी, एलिमिनेटर सामना लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात 25 मे रोजी याच मैदानावर होणार आहे. साखळी टप्प्यातील गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. लखनऊ आणि बेंगलोर या संघांनी गुणतालिकेत अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान पटकावले. तथापि या दोन संघांसाठी आयपीएलचे जेतेपद पटकावणे सर्वात कठीण असणार आहे, हे आम्ही नाही तर आयपीएलची आकडेवारी सांगते. (BCCI अध्यक्षांकडून रोहित शर्मा - विराट कोहलीची पाठराखण, Dhoni शी ऋषभ पंतच्या तुलनेवर दिले हे उत्तर)

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एका संघाने एलिमिनेटर सामना खेळून आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे, त्यामुळे या दोन संघांसाठी ट्रॉफीपर्यंतचा प्रवास खूप कठीण असेल. एलिमिनेटर सामना खेळणाऱ्या संघाला विजेतेपद मिळवण्यासाठी सलग 3 सामने जिंकावे लागतील, त्यामुळे सर्व संघांसाठी हे काम करणे सर्वात कठीण असते. आयपीएलच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद हा एकमेव संघ आहे ज्याने हा पराक्रम केला आहे. एलिमिनेटर सामना खेळून 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादने विजेतेपद पटकावले. त्यावेळी संघाची कमान ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या हाती होती. या संघाने एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) पराभव केला.

आयपीएल 2022 चा अंतिम सामना 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा अंतिम सामना क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 2 मधील विजेत्या संघात खेळला जाईल. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बेंगलोर संघ प्ले ऑफसाठी क्वालिफाय झाले आहेत. या 4 संघांपैकी फक्त राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. तसेच गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स प्रथमच प्लेऑफ सामने खेळणार आहेत.