IPL 2022, MI vs PBKS: पहिल्या विजयाच्या आशेत असलेल्या मुंबईच्या ‘पलटन’मध्ये होणार मोठे बदल; पाहा कोण होणार IN कोण OUT
IPL 2022, MI vs PBKS Match 23: आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आज रोमांचक सामना अपेक्षित आहे. मुंबई इंडियन्स या मोसमात आतापर्यंत पहिल्या विजयाच्या शोधात आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स (MI) आज पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्धच्या सामन्यात विजयाची नोंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू इच्छित असेल आणि यासाठी आज मुंबईच्या पलटनमध्ये मोठे बदल संभव आहे.
IPL 2022, MI vs PBKS Match 23: आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात आज रोमांचक सामना अपेक्षित आहे. मुंबई इंडियन्स या मोसमात आतापर्यंत पहिल्या विजयाच्या शोधात आहे तर पंजाबने चारपैकी दोन सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्ससाठी (MI) आयपीएल 2022 चा हा सीझन आतापर्यंत निराशनजक राहिला आहे. मुंबई इंडियन्सला (MI) आतापर्यंत त्यांच्या पहिल्या 4 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आतापर्यंत आयपीएलच्या (IPL) पॉईंट टेबलमध्ये आपले खाते उघडू न शकणार मुंबई हा एकमेव संघ आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स (MI) आज पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्धच्या सामन्यात विजयाची नोंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू इच्छित असेल आणि यासाठी आज मुंबईच्या पलटनमध्ये मोठे बदल संभव आहे. (IPL 2022: रोहित शर्मा याच्या ‘कॅप्टन्सी’वर माजी क्रिकेटपटूने साधला निशाणा, म्हणाले - ‘Virat Kohli प्रमाणेच पाऊल उचलेल असे वाटले’)
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा फॉर्म मुंबई इंडियन्ससाठी खूप महत्त्वाचा आहे, परंतु त्याचा सलामी भागीदार ईशान किशन (Ishan Kishan) आणि मधल्या फळीत सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा यांनाही फलंदाजीत अधिक जबाबदारी घ्यावी लागेल जेणेकरून अन्य खेळाडूंवरील दडपण कमी होईल. कर्णधार रोहित सध्या बॅटने अधिक प्रभाव पाडू शकलेला नसून तो अजूनही मोठी धावसंख्या गाठण्यासाठी संघर्ष करत आहे. मुंबई इंडियन्सचा डेवाल्ड ब्रेविस यालाही आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे खेळला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा टिम डेविड हा एक अनुभवी पर्याय त्यांच्याकडे उपलब्द असेल. संघ व्यवस्थापनाला आशा आहे की फलंदाजी युनिट एकजुटीने योगदान देईल जेणेकरून संघ मोठी धावसंख्या उभारेल किंवा लक्ष्याचा पाठलाग करताना घाडीच्या फळीतील तीन फलंदाजांपैकी एकाला मोठी खेळी खेळावी लागेल.
मुंबईसाठी सर्वात कमकुवत दुवा म्हणजे अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डची कामगिरी आहे. स्वबळावर सामना फिरवण्याची क्षमता असलेला पोलार्ड त्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाच्या जवळपासही नाही आणि आगामी सामन्यांमध्ये विंडीजचा फलंदाज वेग धरेल अशी आशा आहे. दुसरीकडे, गोलंदाजी विभागात जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, बेसिल थंपी हे चार संघातील आपले स्थान कायम ठेवतील. तर विदेशी गोलंदाजासाठी टायटल मिल्स आणि फॅबियन एलन हे पर्यायात संघाकडे आहे. अशा परिस्थितीत आज आपल्या पहिल्या विजय मिळवण्याच्या आहेत असलेली मुंबई इंडियन्स कोणत्या संयोजनासह मैदानात उतरते याकडे चाहत्यांचे लक्ष लागून असेल.
मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, किरॉन पोलार्ड, फॅबियन एलन, जयदेव उनादकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि बासिल थंपी.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)