IPL 2022 Mega Auction: मेगा लिलावापूर्वी ‘या’ खेळाडूंना शेवटची संधी, वेस्ट इंडिजविरुद्ध चमकले तर लिलावात होतील मालामाल

इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमासाठी खेळाडूंच्या या बहुचर्चित लिलावापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय ताफ्यात सामील 18 पैकी 10 खेळाडू मेगा लिलावात सहभागी होतील. मेगा लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी या मालिकेत चांगली कामगिरी केली तर अनेक संघांना त्यांच्यावर मोठी बोली लावतील.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलावाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगलोर (Bangalore) येथे होणार आहे. आयपीएलच्या (IPL) या बहुचर्चित लिलावापूर्वी भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना 6 फेब्रुवारी, दुसरा सामना 9 आणि तिसऱ्या व अंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. या मालिकेत प्रभावी ठसा उमटवून फ्रँचायझींचे लक्ष वाढण्याची भारतीय खेळाडुंकडे मोठी संधी असेल. वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय ताफ्यात सामील 18 पैकी 10 खेळाडू मेगा लिलावात सहभागी होतील. मेगा लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी या मालिकेत चांगली कामगिरी केली तर अनेक संघांना त्यांच्यावर मोठी बोली लावतील. अशा परिस्थितीत त्यांना लिलावात मोठी रक्कम मिळू शकते. (IPL 2022 Mega Auction: आयपीएल लिलावात ‘या’ सलामीवीरांवर असणार मुंबई इंडियन्सची नजर, बनू शकतात रोहित शर्माचे ओपनिंग पार्टनर)

1. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)

दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार या लिलावापूर्वी चांगलाच चर्चेत आला आहे. अय्यर एक कर्णधार तसेच मधल्या फळीत एक आक्रमक फलंदाजीचा देखील पर्याय मिळवून देतो. आतापर्यंत तीन फ्रँचायझी कर्णधाराच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत या संघाची नजर त्याच्यावर असेल. पण श्रेयस सध्या फॉर्मशी संघर्ष करत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात देखील तो बॅटने फारसे काही करू शकला नाही. त्यामुळे आता मायदेशात विंडीजविरुद्ध लयीत परतण्याचा त्याचा निर्धार असेल.

2. शिखर धवन (Shikhar Dhawan)

आयपीएलच्या 14 व्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सने शिखर धवनला रिटेन केले नाही. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत धवन माजी आरसीबी कर्णधार विराट कोहलीच्या मागे आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत तो सार्वधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होता. अशा स्थितीत त्याच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे, पण जर त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत आपल्या लय कायम ठेवली तर धवनला मोठी बोली लागू शकते.

3. युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)

भारताच्या सर्वोत्तम आणि अनुभवी लेगस्पिन गोलंदाजांपैकी एक असलेल्या चहलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली नाही. चहलला गेल्या काही काळापासून विकेटसाठी संघर्ष करावा लागत आहे. आयपीएलच्या गेल्या मोसमात देखील तो आरसीबीसाठी प्रभावी गोलंदाजी करू शकला नाही, त्यामुळे फ्रँचायझीने त्याला रिलीज केले. अशा स्थितीत वेस्ट इंडिजविरुद्ध चमकदार कामगिरी करून त्याला पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करावे लागेल. चहल आयपीएलमधील सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध सुधार खेळ केल्यास मेगा-लिलावात बोली आकर्षित करू शकतो.

4. दीपक चाहर (Deepak Chahar)

चेन्नई सुपर किंग्सचा माजी गोलंदाज दीपक चाहरने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अष्टपैलू खेळीने अनेकांना प्रभावित केले आहे. दक्षिण आफ्रिकेत तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात दीपकला संधी मिळाली व त्याने त्याचा पूर्ण फायदा करून घेत झुंजार फलंदाजी केली. याशिवाय त्याने बॉलने देखील योगदान दिले. याच कारणामुळे त्याला विंडीजविरुद्ध पुन्हा संधी मिळाली. नव्या चेंडूवर विकेट घेण्यात माहीर दीपक चाहर यंदा अनेक फ्रँचायझींच्या रडारवर असेल, त्यामुळे विंडीज मालिकेत त्याच्यावर बॅट आणि बॉलने आपली लय कायम ठेवण्याचे नक्कीच दडपण असेल.

5. दीपक हुडा (Deepak Hooda)

गेल्या मोसमात पंजाब किंग्ससाठी आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या दीपक हुडासाठीही ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. हुडाने आपल्या काही झंझावाती खेळींनी सामन्याचे चित्र नक्कीच फिरवले आहे, पण त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाने संधी दिल्यास त्याला जबाबदारीने फलंदाजी करून आपली योग्यता सिद्ध करावी लागेल. जर असे झाले तर तो लिलावात मोठी बोली आकर्षित करू शकतो. त्याला आक्रमक फटकेबाजी आणि वेगाने धावा करण्याची आपली क्षमता सिद्ध करावी लागेल. याशिवाय विंडीजविरुद्ध तो स्फोटक तसेच विश्वासार्ह खेळाडू हे देखील दाखवून द्यावे लागेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now