IPL 2022 Mega Auction: शॉर्टलिस्ट खेळाडूंची अंतिम यादी जाहीर; फिटनेस संशयास्पद असून इंग्लंडचा तडाखाबेज खेळाडू उतरला लिलावाच्या रिंगणात

यंदाच्या टी-20 लीगमध्ये त्याचा सहभाग मात्र दुखापतींमुळे संशयाच्या भोवऱ्यात आहे. यावर्षी आयपीएलमध्ये आर्चरच्या खेळण्यावर संभ्रमाची स्थिती कायम असूनही बार्बाडोसमध्ये जन्मलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने त्याचे नाव 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत लिलावासाठी ठेवले आहे.

राजस्थान रॉयल्स (Photo Credit: PTI)

IPL 2022 Auction Players List: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये सहभागी होणार्‍या सर्वोत्कृष्ट परदेशी स्टारपैकी एक इंग्लंडचा तडाखेबाज गोलंदाज जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) 2022 सीझनच्या आधी मेगा लिलावासाठी नोंदणी केली आहे. आर्चरच्या दुखापतीची समस्या लक्षात घेता अनेकांसाठी हा निर्णय आश्चर्यकारक आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लिलावात रिंगणात एकूण 590 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यावर्षी आयपीएलमध्ये (IPL) आर्चरच्या खेळण्यावर संभ्रमाची स्थिती कायम असूनही आर्चर टी-20 लीगसाठी उशीरा नोंदणी करणाऱ्यांपैकी एक आहे. आयपीएलच्या यंदाच्या लिलावासाठी (IPL Auction) फायनल खेळाडूंची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून आर्चरचा यामध्ये समावेश आहे. आर्चर राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य होता, मात्र गेल्या वर्षी तो दुखापतीमुळे खेळला नाही आणि फ्रँचायझीने त्याला लिलावात उतरवले. (IPL 2022 Mega Auction: देश-विदेशातील 590 खेळाडूंवर लागणार बोली, बेंगलोर येथे पार पडणार दोन दिवसीय आयपीएलचा मेगा लिलाव)

दरम्यान, बार्बाडोसमध्ये जन्मलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने त्याचे नाव 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत लिलावासाठी ठेवले आहे. दरम्यान, या यादीत जोफ्रा आर्चरसह 44 नवीन खेळाडूंची नावे जोडली गेली आहेत. या खेळाडूंनी यापूर्वी लिलावात आपली नावे दिली नव्हती. अलीकडेच, इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस कसोटीच्या दोन्ही डावांत शतके झळकावणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा याने देखील आपले नाव लिलावासाठी ठेवले आहे. ख्वाजाने त्याची मूळ किंमत दीड कोटी रुपये ठेवली असून यापूर्वी लिलावात त्याने आपले नाव समाविष्ट केले नव्हते. उल्लेखनीय म्हणजे 44 नवीन खेळाडूंचा समावेश असूनही ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचे नाव लिलावात नाही. अनेक फ्रँचायझींची इच्छा असूनही गेलने आपले नाव दिलेले नाही.

याशिवाय BCCI ने 10 फ्रँचायझींना कळवले आहे की इंग्लंडचा वेगवान गोलंदाजाच्या, दुखापतीचे स्वरूप लक्षात घेऊन, लीगच्या 15 व्या आवृत्तीत सहभागी होण्याबाबत साशंकता राहील. केवळ डिसेंबरमध्ये वेगवान गोलंदाजाच्या कोपऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती ज्यामुळे त्याला या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत खेळापासून दूर ठेवण्यात आले आहे. IPL 2022 च्या लिलावासाठी एकूण 1214 खेळाडूंनी नोंदणी केली होती. पण आता ही यादी 590 पर्यंत छोटी करण्यात आली आहे. या यादीनुसार अफगाणिस्तानचे एकूण एक, ऑस्ट्रेलियाचे सहा, भारताचे 11, आयर्लंडचे दोन, न्यूझीलंडचे सहा, स्कॉटलंडचे दोन, श्रीलंकेचे आणखी चार, वेस्ट इंडिजचे प्रत्येकी चार आणि इंग्लंडचे एक असे अतिरिक्त खेळाडू लिलावात सामील झाले आहेत.