IPL 2022: दिल्लीविरुद्ध सामन्यातून Suryakumar Yadav ‘बाहेर’, मुंबई इंडियन्स कडे आहे बदली म्हणून ‘या’ युवा खेळाडूंचा पर्याय

यापूर्वी पत्रकार परिषदेत मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव अद्याप दुखापतीतून सावरला नसू दिल्लीविरुद्ध सामन्यातून बाहेर पडल्याची पुष्टी केली. अशा परिस्थितीत मुंबईच्या XI मध्ये यादवची जागा घेण्यासाठी तीन युवा खेळाडू दावेदार आहे.

सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामाची सुरुवात 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सलामीच्या सामन्याने होईल. तर पाच वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) 27 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) आपल्या सहाव्या विजेतेपदाच्या निर्धाराने मोहिमेची सुरुवात करेल. यापूर्वी एका आभासी पत्रकार परिषदेत मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अद्याप दुखापतीतून सावरला नसू दिल्लीविरुद्ध सामन्यातून बाहेर पडल्याची पुष्टी केली. आयपीएलच्या मागील आवृत्त्यांमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमारने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. अशा परिस्थितीत यादवची जागा घेण्यासाठी एका उपयुक्त खेळाडूची निवड करणे माजी चॅम्पियन संघासाठी मोठी डोकेदुखी ठरेल हे नक्की. दरम्यान, सूर्यकुमारची बदली म्हणून मुंबईच्या 11 खेळाडूंमध्ये जागा घेण्यासाठी तीन युवा खेळाडू दावेदार आहेत. (IPL 2022: रोहित शर्मा याने पुष्टी केली, ‘हा’ तुफानी फलंदाज पहिल्या सामन्यातून ‘आऊट’; वर्कलोड आणि हार्दिक पांड्या याच्यावर केलं मोठं वक्तव्य)

1. डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis)

दक्षिण आफ्रिकेचा अंडर 19 विश्वचषक स्टार डेवाल्ड ब्रेविस याला मुंबई इंडियन्स (MI) ने 3 कोटीची रक्कम देऊन ताफ्यात सामील केले. दक्षिण आफ्रिकेचा 18 वर्षीय फलंदाज ‘बेबी एबी डिव्हिलियर्स’ म्हणून प्रसिद्ध आहे. वेस्ट इंडिजमध्ये नुकत्याच पार पडलेल्या अंडर-19 विश्वचषकात ब्रेविसला मालिकावीर ठरला. त्याने सहा डावांमध्ये 84.33 च्या सरासरीने आणि 90.19 च्या स्ट्राईक रेटने 506 धावा चोपल्या. अशा परिस्थितीत तो पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवची जागा घेण्यासाठी मुख्य दावेदार ठरू शकतो. ब्रेविसकडे टी-20 लीगचा अनुभव कमी असला तरी सध्या नेट्समध्ये त्याला फलंदाजी करताना पाहून तो नक्कीच मोठे फटके सक्षम असल्याचं दाखवून दिलं.

2. एन. टिळक वर्मा (N Tilak Varma)

पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने 19 वर्षीय मधल्या फळीतील फलंदाज टिळक वर्मा सप्टेंबर 2019 मध्ये खेळलेल्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध 119 चेंडूत 110 धावा केल्या नंतर प्रकाशझोतात आला. त्याची प्रतिभा ओळखून MI ने फलंदाजाला 20 लाखाच्या मूळ किमतीतून 1.7 कोटी रुपयात खरेदी केले. रोहित शर्मा देखील पत्रकार परिषदेत टिळक वर्मा सकारात्मक दिसला, अशा परिस्थितीत वर्मा सूर्यकुमारच्या जागी फलंदाजीला उतरू शकतो.

3. अनमोलप्रीत सिंह (Anmolpreet Singh)

सूर्यकुमार यादव आतापर्यंत फक्त पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. पण पुढील सामन्यांसाठी देखील तो अनुपलब्ध नसल्याची त्याच्या जागी अनमोलप्रीत सिंग याचा विचार करणे मुंबईला भाग पडण्याची शक्यता आहे. अनमोलप्रीतला 2019 आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते. विशेषत: फिरकीविरुद्ध त्याच्या मोठे फटके खेळण्याससाठी अप्रसिद्ध आहे.