IPL 2022, CSK vs MI: 9 वर्षांनंतर तेच मैदान, तेच प्रतिस्पर्धी; मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जने केली इतिहासाची पुनरावृत्ती केली

IPL 2022, CSK vs MI: इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या 59 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ 97 धावांवर गारद झाला. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या होती. विशेष म्हणजे 9 वर्षांपूर्वी याच वानखेडेच्या मैदानावर सीएसके मुंबईविरुद्ध सर्वात कमी 79 धावांत ऑलआऊट झाला होता. अशाप्रकारे सामन्यात चेन्नईने तब्बल 9 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती झाली.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs MI: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या 59 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) संपूर्ण संघ 97 धावांवर गारद झाला. डॅनियल सॅम्सने अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकात 16 धावा देत तीन बळी घेतले. त्याने चेन्नईला सुरुवातीचे धक्के देत संघाचे कंबरडे मोडले. यानंतर उरलेले काम जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, कार्तिकेय आणि रमणदीप यांनी केले. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या होती. विशेष म्हणजे 9 वर्षांपूर्वी याच वानखेडेच्या मैदानावर सीएसके (CSK) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध सर्वात कमी 79 धावांत ऑलआऊट झाला होता. अशाप्रकारे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाने तब्बल 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. ड्वेन ब्रावोने 12 धावा आणि अंबाती रायडू व शिवम दुबेने 10-10 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. (IPL 2022 CSK vs MI: ‘हम तो डूबे हैं सनम, तुमको भी...’ रोमांचक सामन्यात मुंबईने चेन्नईला 5 विकेट्सने लोळवलं, PlayOff शर्यतीत सुपर किंग्सचा ‘गेम ओव्हर’!)

चेन्नईची धावसंख्या एका वेळी 6 बाद 39 अशी होती पण एमएस धोनीने एक टोक पकडले. काही काळ ड्वेन ब्रावो (12), शिवम दुबे (10) आणि अंबाती रायुडू (10) यांनी धोनीला साथ दिली पण संघाची धावसंख्या 100 च्या पुढे जाऊ शकली नाही. चेन्नईसाठी धोनीने सर्वाधिक धावा केल्या आणि नाबाद राहिला. त्याने 33 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 36 धावा केल्या. धोनीने सीएसकेसाठी एका डावात सर्वोच्च धावांची खेळी करण्याची ही 21 वी वेळ आहे. तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब झाली. सीएसकचा अर्धा संघ पॉवरप्लेमध्येच 32 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला. यादरम्यान डेव्हॉन कॉनवे आणि मोईन अली खातेही उघडू शकले नाही. रा रॉबिन उथप्पा (1), ऋतुराज गायकवाड (7) आणि अंबाती रायडू (10) लगेचच बाद झाले. यानंतर कर्णधार एमएस धोनी आणि शिवम दुबे यांनी संयमाने डाव पुढे नेला. मात्र दुबे (10) देखील मेरेडिथचा बळी पडला.

धोनी एक टोक धरून फलंदाजी करत असताना दुसऱ्या टोकावरून विकेट पडत राहिल्या. त्याने 21व्यांदा आपल्या फ्रँचायझीसाठी एका डावात सर्वाधिक धावा केल्या. मिस्टर आयपीएल सुरेश रैना या बाबतीत आघाडीवर आहे. रैनाने सीएसकेसाठी 33 वेळा धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर चेन्नईचा माजी सलामीवीर आणि आरसीबीचा सध्याचा विद्यमान कर्णधार फाफ डु प्लेसिस या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने सीएसकेसाठी 26 वेळा एका डावात सर्वाधिक धावा केल्या आहेत. दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे तर मुंबई इंडियन्सनंतर आता चेन्नई सुपर किंग्जचा प्रवास संपुष्टात आला आहे. चेन्नईचा हा 8वा पराभव झाला असून यासह एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईचा संघ प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2022 च्या 59व्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव केला. या मोसमातील मुंबईचा हा तिसरा विजय आहे, तर चेन्नईने 8 वा सामना गमावला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now