IPL 2022: चेन्नई सुपर किंग्सला जोरदार झटका, Deepak Chahar संपूर्ण लीगमधून ‘बाहेर’; रसिक सलामच्या जागी हर्षित राणा KKR च्या ताफ्यात

चार वेळा इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) वेगवान गोलंदाज दीपक चाहर पाठीच्या दुखापतीमुळे एकही सामना न खेळता आयपीएल 2022 मधून बाहेर पडला आहे. शुक्रवारी बीसीसीआयने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रसिक सलाम याच्या जागी वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा संघात समावेश केला आहे.

IPL 2022: चेन्नई सुपर किंग्सला जोरदार झटका, Deepak Chahar संपूर्ण लीगमधून ‘बाहेर’; रसिक सलामच्या जागी हर्षित राणा KKR च्या ताफ्यात
दीपक चाहर आणि रसिक सलाम (Photo Credit: Twitter/IPL)

चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) पाठीच्या दुखापतीमुळे TATA इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मधून बाहेर पडला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Rider) वेगवान गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) याला उर्वरित हंगामासाठी वेगवान गोलंदाज रसिक सलामच्या (Rasikh Salam) जागी करारबद्ध केले आहे. या मोसमात KKR साठी 2 सामने खेळलेल्या सलामला पाठीच्या खालच्या दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2022 05:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).