IPL 2022 Auction: आयपीएल लिलावात पहिल्या दिवशी इशान किशन ठरला सर्वत महागडा खळाडू; अनेकजण मालामाल

लिलावाच्या पहिल्याच दिवशी बोलींनी कोट्यवधींची उड्डाणे केली. पहिल्याच दिवशी इशान किशन (Ishan Kishan) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला.

Ishan Kishan | (Photo Credit: Twitter))

IPL 2022 Auction: आईपीएल 2022 लिलाव यंदा सर्वाधिक चर्चेत राहिला तो खेळाडूंवर लागलेल्या बोलींमुळे. लिलावाच्या पहिल्याच दिवशी बोलींनी कोट्यवधींची उड्डाणे केली. पहिल्याच दिवशी इशान किशन (Ishan Kishan) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. सुरुवातीला श्रेयस अय्यर याच्यावर मोठी बोली लागली. मात्र, त्यानंतर काहीच वेळात श्रेयसचा उच्चांक मोडत इशान किशन याने बाजी मारली. इशानला मुंबई इंडियन्स संघाने 15.25 रुपयांना खरेदी केले. तर श्रेयसला कोलकाता नाईट रायडर्सने 12.25 कोटींना खरेदी केले.

आयपीएल ऑक्शनच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरण्याचा विक्रम युवराज सिंह याच्याच नावावर आहे. आयपीएल 2015 मध्ये युवराज सिंह यांच्यावर दिल्ली कॅपटल्स संघाने 16 कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केले होते. याशिवाय ही पहिलीच वेळ आहे. मुंबई इंडियन्स संघाने एखादा खळाडू खरेदी करण्यासाठी 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या आधी मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्मा याला 9.2 कोटी रुपये खर्च केले होते. (हेही वाचा, )

मोठी बोली लागलेले खेळाडू

आयपीएल लिलावाच्या इतिहासाबाबत बोलायचे तर सर्वात महागडा खेळाडू क्रिस मॅरीस आहे. त्याला 16.25 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले होते. दुसऱ्या क्रमांकावर युवराज सिंह आहे. तीसऱ्या क्रमांकावर पॅट कमिन्स आहे. कोलकाता नाईटरायडर्सने त्याला 15.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. चौथ्या क्रमांकावर इशान शर्माआहे. तर 15 कोटींच्या बोलीसह काईल जॅमसीने हा आे. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर खरेदी केले होते.