IPL 2021: Suresh Raina ने धरले Harbhajan Singh याचे पाय, चेन्नई-कोलकाता लढतीपूर्वी घडलेल्या क्षणाचा पहा हृदयस्पर्शी व्हिडिओ
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 21 एप्रिल रोजी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएलच्या 15व्या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंमधील भावनिक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) सुपरस्टार सुरेश रैनाने बुधवारी केकेआर विरोधातील सामन्यापूर्वी आपला माजी सीएसके सहकारी हरभजन सिंहचे पाय धरले.
IPL 2021: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) 21 एप्रिल रोजी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील आयपीएलच्या (IPL) 15व्या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंमधील भावनिक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व करूनही खेळाडूंचे एकमेकांशी असलेले संबंध इंडियन प्रीमियर लीगला (Indian Premier League) जगातील एक सर्वोत्कृष्ट स्पर्धा बनवते. सीएसकेचा (CSK) सुपरस्टार सुरेश रैनाने (Suresh Raina) बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरोधातील सामन्यापूर्वी आपला माजी सीएसके आणि भारतीय सहकारी हरभजन सिंह (Harbhajan Singh) याचे पाय धरले. (KKR vs CSK IPL 2021: दीपक चाहरने केला कहर; चेन्नईचा कोलकातावर 18 धावांनी धमाकेदार विजय; आंद्रे रसेल-पॅट कमिन्सचे अर्धशतक व्यर्थ)
या मोसमात पहिल्या भेटी वेळी रैना अनुभवी फिरकीपटूच्या पायाला स्पर्श करताना दिसला. हातात बॅट घेऊन रैना मैदानात येत असताना हरभजनच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. रैनाला चकवण्याच्या प्रयत्नात भज्जी मैदानावर बसला. आयपीएलमधील खेळाडूंच्या समावेशाबद्दल चाहत्यांनी कौतुक केले. दरम्यान यूजर्सने या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केले आहे. लीगमुळे केवळ भारतीयच नाही तर परदेशी खेळाडूदेखील भारतीय सहकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. सामन्याबद्दल बोलायचे तर हरभजन केकेआर प्लेइंग इलेव्हनचा भाग नसला तरी सीएसकेच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असूनही रैनाला फलंदाजीची संधी मिळाली नाही. फाफ डु प्लेसिसच्या नाबाद 95 आणि दीपक चाहरच्या 4 विकेटच्या जोरावर चेन्नईने केकेआरला 18 धावांनी पराभूत केले व सीएसके आयपीएल 2021 गुणतालिकेत अव्वल क्रमांक गाठले.
Life isn't about having a thousand friends, it's about finding the very few right ones you need.#friendship #Brotherhood@ImRaina & @harbhajan_singh pic.twitter.com/P3YqLNu9vO
— only Seatiger (@410seatiger) April 21, 2021
ड्यू प्लेसिसने नाबाद 95 धावा फटकावल्या तर त्याचा सलामीचा साथीदार रुतूराज गायकवाडने 42 चेंडूत 64 धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारीच्या जोरावर चेन्नईने अखेर 220 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, केकेआरची आघाडीची फळी अडखळली आणि पॉवरप्लेमध्ये संघाची स्थिती 31 धावांवर 5 विकेट अशी झाली. त्यानंतर आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स यांनी केकेआरच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. कमिन्सने अखेरच्या काही क्षणात केलेल्या फटकेबाजीचा सामना करत 18 धावांनी विजय मिळवला. कमिन्स 66 धावा करून नाबाद परतला.
(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2021 08:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

