IPL 2021 मध्ये घडली चकित करणारी घटना, एकाच चेंडूवर पकडले दोन कॅच पण फलंदाज झाला नाही OUT; पहा Qualifier-2 मधील आश्चर्यकारक दृश्य (Watch Video)

दोन वेगवेगळे फलंदाज दोन चेंडूंमध्ये ‘झेलबाद’ झाले पण प्रत्यक्षात दोघेही बाद झाले नाहीत. ही गोष्ट थोडी हैराण करणारी वाटते पण आयपीएलमध्ये सर्व काही शक्य आहे. झाले असे की शिमरॉन हेटमायरला 17 व्या षटकात जीवदान मिळाले.

शिमरॉन हेटमायर (Photo Credit: PTI)

आयपीएल (IPL) 2021 मध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सुरु असलेल्या क्वालिफायर-2 सामन्यात एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाले. दोन वेगवेगळे फलंदाज दोन चेंडूंमध्ये ‘झेलबाद’ झाले पण प्रत्यक्षात दोघेही बाद झाले नाहीत. ही गोष्ट थोडी हैराण करणारी वाटते पण आयपीएलमध्ये सर्व काही शक्य आहे. झाले असे की शिमरॉन हेटमायरला (Shimron Hetmyer) 17 व्या षटकात जीवदान मिळाले. वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakravarthy) गोलंदाजीवर मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात हेटमायर शुभमन गिलकडे झेलबाद झाला. अत्यंत निराश मनाने हेटमायर माघारी परतत होते. पण नंतर थर्ड अंपायरने व्हिडिओ रिप्लेमध्ये चक्रवर्तीने पाय क्रीजच्या पुढे टाकला असल्याचे सांगितले. हेटमायर निराश होऊन बाउंड्री लाईनवर निर्णयाची प्रतीक्षा करत असताना थर्ड अंपायरने त्याला नाबाद घोषित केले. तिसऱ्या अंपायरचा निर्णय पाहून त्याने आनंदाने उडी मारली आणि लगेचच खेळपट्टीवर परतला. (IPL 2021, KKR vs DC Qualifier 2: दिल्ली फलंदाजांची हाराकिरी; कोलकातापुढे अवघे 136 धावांचे टार्गेट)

हेटमायर परत आला तेव्हा त्याने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सोबत जागा बदलली होती. अशा परिस्थितीत नो बॉल नंतरचा पुढचा चेंडू फ्री-हिट होता. अय्यरला या चेंडूवर मोठा शॉट खेळायचा होता, पण इयन मॉर्गनने त्याला पॉईंटजवळ झेलबाद केले. आता चेंडू फ्री-हिट असल्याने तो देखील नाबाद राहिला. कारण केवळ रनआउट फ्री हिटवर वैध आहे. दरम्यान, हेटमायरला जीवदान मिळताच त्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने लॉकी फर्ग्युसनच्या एकाच षटकात दोन उत्तुंग षटकार खेचले. पण 19 व्या षटकात हेटमायरने अशी चूक केली, ज्यामुळे त्याने आपली विकेट गमावली. हेटमायरने व्यंकटेश अय्यरकडे चेंडू असताना एक धाव चोरण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या अचूक थ्रोने दिल्लीच्या फलंदाजाला पॅव्हिलियनमध्ये परतण्यास भाग पाडले. हेटमायरने 10 चेंडूत 17 धावा केल्या. हेटमायरच्या अशा प्रकारे धावबाद झाल्यामुळे दिल्ली संघाला अडचणीत असताना मोठा धक्का बसला.

दरम्यान, दिल्लीचा पहिला डाव संपुष्टात आला आहे. टॉस गमावून पहिले फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 5 बाद 135 धावा केल्या. शारजाहच्या कठीण खेळपट्टीवर शिखर धवनने दिल्लीसाठी सर्वाधिक 36 धावा केल्या. श्रेयस अय्यरनेही नाबाद 30 धावांची खेळी केली. मार्कस स्टोइनिस आणि पृथ्वी शॉ यांनी प्रत्येकी 18 धावांची खेळी खेळली. दुसरीकडे, कोलकातासाठी वरुण चक्रवर्ती सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकांत 26 धावा देऊन 2 गडी बाद केले. तसेच फर्ग्युसन आणि शिवम मावी यांनीही प्रत्येकी 1 गडी बाद केला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif