IPL 2021: मुंबई इंडियन्ससाठी या करणामुळे Hardik Pandya बनला चिंतेचा विषय, 3 खेळाडू करू शकतात रिप्लेस

तथापि मागील अनेक वर्षांपासून संघासाठी नियमित अष्टपैलूची भूमिका बजावणाऱ्या हार्दिक पांड्या सध्या संघासाठी डोकेदुखी नक्कीच ठरत आहे.

हार्दिक पंड्या (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) पाच वेळा विजेते मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) मोसमातील सलामीच्या सामन्यातील पराभवाला मागे टाकत पुढील दोन सामन्यात विजय मिळवला आणि आपली  गाडी विजयपथावर आणली आहे. तथापि मागील अनेक वर्षांपासून संघासाठी नियमित अष्टपैलूची भूमिका बजावणाऱ्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या संघासाठी डोकेदुखी नक्कीच ठरत आहे. हार्दिकला आशिया चषक दरम्यान टीव्ही वर्षांपूर्वी पाठीला दुखापत झाली होती त्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर हार्दिक टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सकडून बॉलिंग करताना दिसला नाही मात्र, सध्या तो बॅटने देखील तो योगदान देण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे हार्दिकच्या जागी आगामी सामन्यात मुंबई अन्य तीन फलंदाजांना संधी देण्याचा विचार करू शकतात. (IPL 2021: मुंबईविरुद्ध तिसर्‍या पराभवानंतर ‘या’ दिग्गज भारतीयचा SRH संघात समावेश करण्याची मागणी, लिलावात 2 कोटीमध्ये केले खरेदी)

1. सौरभ तिवारी

सौरभ तिवारी मुंबई संघात हार्दिकच्या जागी खेळण्याची शक्यता अधिक होऊ शकते. तिवारी यापूर्वी देखील मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. मागील वर्षी रोहितच्या जागी त्याचा समावेश केला होता ज्याने संघाला गरज असताना धावा लुटल्या आहेत. शिवाय, आक्रमक फलंदाजी करत मधल्या फळीत संघासाठी धावा करण्याची त्याची क्षमता आहे जी त्याला हार्दिकच्या बदली एक योग्य फलंदाज बनवते.

2. आदित्य तरे

मुंबई संघाचा अनेक वर्षांपासून सदस्य असलेल्या तरेने गेली अनेक वर्ष संघ अडचणीत असताना त्याने बॅटने आपली कमाल केली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध 2014 मध्ये आदित्यने खेळलेला तो निर्णायक सामना तर चाहत्यांच्या नक्कीच लक्षात असेल. त्यामुळे, तो हार्दिकच्या जागी मधल्या फळीत येत संघाची धावगती वाढवू शकतो.

3. अनुकूल रॉय

बिहारचा रणजी अष्टपैलू रॉयने आयपीएल 2019 मध्ये पदार्पण केले. चेन्नई सुपर किंग्स विरोधात त्याने पहिला सामनाही खेळला. रॉयचा डोमेस्टिक क्रिकेटमधील रेकॉर्स अप्रतिम आहे. झारखंडकडून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 446, लिस्ट A क्रिकेटच्या 27 सामन्यात 621 धावा आणि टी -20 क्रिकेटमध्ये 26 सामन्यांच्या 19 डावांमध्ये 216 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गोलंदाजीत 40, लिस्ट ए क्रिकेटमध्ये 32 आणि टी -20 क्रिकेटमध्ये 13 बळी घेतले आहेत त्यामुळे, हार्दिकच्या जागी तो एक उपयुक्त फलंदाज आणि अतिरिक्त गोलंदाज सिद्ध होऊ शकतो.