IPL 2021, RCB vs PBKS: लिलावात ज्याला नाही दिला योग्य भाव त्यानेच विराट कोहलीच्या RCB चा केला खेळ खराब, 4 षटकांत डाव उलटला

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध मोईसेस हेन्रिक्ससह मैदानात उतरण्याचा पंजाब किंग्सचा निर्णय योग्य ठरला. हेन्रिक्सने आपल्या गोलंदाजीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा टॉप ऑर्डर उद्ध्वस्त करण्याचे काम केले. आयपीएल 2021 च्या लिलावात हेन्रिक्ससाठी बेंगलोर आणि पंजाब किंग्जमध्ये चुरशीची लढाई झाली होती, पण शेवटी पंजाब या खेळाडूला 4.2 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात सामील करण्यात यशस्वी झाला.

पंजाब किंग्स (Photo Credit: PTI)

IPL 2021, RCB vs PBKS: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध पंजाब किंग्सचा (Punjab Kings) कर्णधार केएल राहुलचा मोईसेस हेन्रिक्ससह मैदानात उतरण्याचा निर्णय योग्य ठरला. पंजाबने नॅथन एलिसला बाहेर करून हेन्रीक्सला (Moises Henriques) संधी देण्याचा निर्णय घेतला. ज्याने आपल्या गोलंदाजीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा टॉप ऑर्डर उद्ध्वस्त करण्याचे काम केले. या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने विराट कोहली (Virat Kohli), देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal) सारख्या फलंदाजांना दोन षटकांतच पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यामुळे बेंगलोरचा संघ दमदार सुरुवात करूनही स्कोअर बोर्डवर मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. हेन्रीक्सने चार षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 12 धावा दिल्या आणि तीन मोठ्या विकेट्स घेतल्या. कांगारू खेळाडूने सलग दोन चेंडूंमध्ये कोहली आणि डॅनियल ख्रिश्चनला पॅव्हिलियनमध्ये पाठवले. (IPL 2021, RCB vs PBKS: विराट ‘आर्मी’ची प्लेऑफ मध्ये धडक, रंगतदार सामन्यात बंगलोरची पंजाबवर 6 धावांनी मात)

हेन्रिक्सने 24 पैकी 13 डॉट बाळ टाकले आणि आरसीबीच्या फलंदाजांना प्रत्येक धावेसाठी संघर्ष करायला लावला. आयपीएल 2021 च्या लिलावात हेन्रिक्सला मिळवण्यासाठी बेंगलोर आणि पंजाब किंग्जमध्ये चुरशीची लढाई झाली होती, पण शेवटी पंजाब या खेळाडूला 4.2 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात सामील करण्यात यशस्वी झाला. आणि युएई येथे यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाबच्या जर्सीमध्ये पहिला सामना खेळण्यासाठी उतरताच हेन्रिक्सने आरसीबीचेच खेळ खराब केला. यापूर्वी टॉस जिंकून फलंदाजी करण्यासाठी बेंगलोरसाठी देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार विराट कोहलीची जोडी सलामीला उतरला. दोघांनी जोरदार फटकेबाजी करून संघाला तुफान सुरुवात दिली आणि पॉवरप्लेच्या सहा षटकांत 55 धावा काढल्या. यादरम्यान, रवी बिश्नोईच्या त्याच षटकात पंजाबचा कर्णधार केएल राहुलनेही कोहली-पडिक्कला जीवदान दिले.

यानंतर 25 धावा करून विराट मोईसेस हेन्रिक्सचा शिकार बनला. त्यांनतर पुढील ओव्हरमध्ये त्याने पडिकलला 38 चेंडूत 40 धावांवर राहुलकडे विकेटच्या मागे झेलबाद केले. तथापि अखेरीस बेंगलोरने ग्लेन मॅक्सवेलच्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर 164 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात राहुल आणि मयंकने दिलेल्या चांगल्या सुरुवातीचा पंजाब किंग्स पुढे जाऊन फायदा उचलू शकले नाही आणि फक्त 6 धावांनी संघाला पराभव पत्करावा लागला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now