IPL 2021, RCB vs PBKS: आउट की नॉटआउट? बेंगलोर-पंजाब सामन्यात असे काय घडले की पंचांशी जाऊन भिडला केएल राहुल (Watch Video)
इंडियन प्रीमियर लीग 2021 मध्ये रविवारी, डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्ज शारजाह येथे आमनेसामने आले आहेत. आरसीबीच्या डावाच्या 8 व्या षटकात असे काही घडले की पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल मैदानावरील पंचांशी जाऊन भिडला. जेव्हा रवी बिष्णोई गोलंदाजीसाठी आला, तेव्हा चौथ्या चेंडूवर असे काही घडले की मैदानावर गोंधळ उडाला.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये रविवारी, डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) शारजाह येथे आमनेसामने आले आहेत. बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली, पण आरसीबीच्या (RCB) डावाच्या 8 व्या षटकात असे काही घडले की पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) मैदानावरील पंचांशी जाऊन भिडला. बेंगलोरने पंजाबविरुद्ध शानदार सुरुवात केली. विराट कोहली आणि देवदत्त पडिकलच्या (Devdutt Padikkal) जोडीने पंजाब किंग्जला त्रास देत संघाला आक्रमक सुरूवात करून दिली. बेंगलोरच्या डावाच्या आठव्या षटकात, जेव्हा रवी बिष्णोई गोलंदाजीसाठी आला, तेव्हा चौथ्या चेंडूवर असे काही घडले की मैदानावर गोंधळ उडाला. (IPL 2021, RCB vs PBKS: शारजाहत मॅक्सवेलची फटकेबाजी, बेंगलोरचे पंजाबसमोर 165 धावांचे आव्हान; शमीच्या अंतिम षटकात तीन विकेट)
देवदत्त पडिक्कलने बिष्णोईच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या जवळून थेट यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातात गेला. राहुलने अपील केले पण अंपायरने नॉट आउट दिले, त्यानंतर जेव्हा पंजाब संघाने रिव्ह्यू घेतला, तेव्हाही थर्ड अंपायरने त्याला नॉट आउट दिले. राहुल या प्रकरणावर चिडला, कारण जेव्हा थर्ड अंपायर निर्णयाचा आढावा घेत होता, तेव्हा अल्ट्रा एजमध्ये असे दिसून आले की चेंडू ग्लोव्जच्या बाजूने जात असताना थोडा स्पर्श झाला. यानंतरही पंचांनी नॉट आउट दिले. राहुल याबद्दल चिडला आणि थेट अंपायरकडे गेला. राहुल पंचांशी अल्ट्रा एजबद्दल बोलला पण पंचाने पडिक्क्लला आऊट दिले नाही. सोशल मीडिया यूजर्सने देखील पंचांच्या निर्णयाला चुकीचे म्हटले आणि तंत्रज्ञान असूनही असा निर्णय घेण्याचा निषेध केला. पडिक्क्लने या सामन्यात 40 धावा केल्या आणि शेवटी राहुलनेच त्याचा झेल टिपला.
अंपायरशी भिडला केएल राहुल
शारजाहमध्ये नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने चांगली सुरुवात केली. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलने पॉवरप्लेनंतर आरसीबीला बिनबाद 55 धावसंख्या गाठून दिली. यादरम्यान पंजाबने त्यांच्या अडचणीत भर घालत दोन सोपे झेल सोडले. तथापि, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मोईसेस हेन्रिक्सने त्यांना 10 व्या षटकात सलग चेंडूंमध्ये विराट कोहली आणि डॅन ख्रिश्चन यांना काढून स्पर्धेत कमबॅक करून दिले. त्याने नंतर 40 धावांवर पडिक्क्लची मोठी विकेट घेतली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)