IPL 2021: आयपीएल पूर्वीच वाढलं रोहित शर्माच टेंशन, ‘हा’ धाकड ओपनर Mumbai Indians संघाच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी यजमान संघाच्या मर्यादित ओव्हर संघाची घोषणा झाली आहे असून यामुळे इंडियन प्रीमियर लीगची सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सला मोठा फटका बसला आहे कारण संघाचा धाकड सलामी फलंदाज क्विंटन डी कॉक आपल्या आंतरराष्ट्रीय करारबद्धतेमुळे संघाच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर पडू शकतो.

क्विंटन डी कॉक (Photo Credit: Twitter/IPL)

पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघाच्या आगामी दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यासाठी यजमान संघाच्या मर्यादित ओव्हर संघाची घोषणा झाली आहे असून यामुळे इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा फटका बसला आहे. यंदा भारतात 9 एप्रिलपासून आयपीएलची (IPL) सुरुवात होणार असून स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने येतील. मुंबई इंडियन्ससध्या विजयाची हॅटट्रिक करत रेकॉर्ड सहावे विजेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने टूर्नामेंटमध्ये उतरतील. मात्र, यापूर्वी रोहित शर्माच टेंशन वाढलं आहे कारण संघाचा धाकड सलामी फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आपल्या आंतरराष्ट्रीय करारबद्धतेमुळे संघाच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर पडू शकतो. एप्रिल महिन्यात 2, 4 आणि 7 मार्च रोजी आफ्रिका आणि पाकिस्तान संघात वनडे मालिका खेळली जाणार आहे. (IPL 2021 पूर्वी संघांसाठी धोक्याची घंटा! SRH कर्णधार डेविड वॉर्नरचा ट्रेलर, घरगुती स्पर्धेत ठोकले वादळी शतक)

अशास्थितीत, डी कॉक आणि संघातील अन्य खेळाडूं आपापल्या संघाच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. डी कॉकची पहिल्या काही सामन्यांसाठी अनुपस्थिती संघाचं टेंशन नक्कीच वाढवणारी आहे. यामध्ये, कगिसो रबाडा, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, आणि एनरिच नॉर्टजे यांचा समावेश आहे आणि यामागील मुख्य कारण म्हणजे क्वारंटाइन कालावधी आहे. पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिकेचा अखेरचा सामना 7 एप्रिल रोजी खेळला जाणार असून आयपीएलला 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे, त्यामुळे या खेळाडूंना कमीत-कमी आठवडाभर तरी क्वारंटाइन होणे आवश्यक असेल. मुंबई इंडियन्सकडे डी कॉकच्या जागी ऑस्ट्रेलियन फलंदाज पर्याय म्हणून उपलब्ध आहे. डी कॉकच्या जागी पाच वेळा आयपीएल विजेत्यांची ऑस्ट्रेलियन क्रिस लिन मैदानावर उतरू शकतो.

दुसरीकडे, एकदिवसीय संघात इमरान ताहिर, क्रिस मॉरिस आणि फाफ डु प्लेसिसची निवड झालेली नसल्याने ते संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असतील. शिवाय, नव नियुक्त कर्णधार टेंबा बावुमाच्या नेतृत्वात संघ पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. यापूर्वी, डी कॉक याच्याकडे नेतृतवाची जबादारी सोपवण्यात आली होती मात्र, मागील महिन्यात बावुमाला मर्यादित ओव्हर संघाचे कर्णधारपद देण्यात आले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now