IPL 2021 Playoffs Scenario: 33 सामन्यानंतर प्लेऑफचे चित्र जवळपास स्पष्ट, ‘या’ संघाच्या पदरी आली निराशा तर 2 संघांचे स्थान जवळपास निश्चित
आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये आतापर्यंत एकूण 33 सामने झाले आहेत आणि प्लेऑफचे चित्र देखील स्पष्ट झाले आहे. दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा एकदा पहिले स्थान काबीज केले आहे आणि प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यापासून फक्त 1 विजय दूर आहे.
IPL 2021 Playoffs Scenario: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) खेळल्या गेलेल्या 33 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या हैदराबादची फलंदाजी मागील सामन्या इतकीच खराब राहिली. यामुळे हैदराबादचा संपूर्ण संघ 20 षटकांत केवळ 134 धावाच करू शकला. दिल्ली कॅपिटल्सच्या मजबूत फलंदाजी क्रमपुढे ही धावसंख्या कमजोर ठरली. आणि दिल्लीच्या फलंदाजांना इथे पोहचण्यात फार मेहनत करावी लागली नाही. शिखर धवनच्या 42 आणि श्रेयस अय्यरने दिल्लीला 8 गडी राखून सामना जिंकला आणि गुणतालिकेत पुन्हा पहिले स्थान गाठले. आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये आतापर्यंत एकूण 33 सामने झाले आहेत आणि प्लेऑफचे (IPL Playoffs) चित्र देखील स्पष्ट झाले आहे. (IPL 2021 Points Table Updated: सनरायझर्स हैदराबादसाठी प्लेऑफचा मार्ग जवळपास बंद, तर दिल्लीच्या राजधानी एक्सप्रेसची घोडदौड प्ले-ऑफच्या दिशेने!)
आयपीएलचा दुसरा टप्पा सुरु होण्यापूर्वी दिल्ली गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होती. पण दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत गुणतालिकेत प्रथम गाठले आणि दिल्ली कॅपिटल्सला दुसऱ्या स्थानावर ठकलेले होती, पण आता पुन्हा एकदा दिल्लीने पहिले स्थान काबीज केले आहे. आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांपैकी 7 सामने जिंकून दिल्ली कॅपिटल्स 14 गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यापासून फक्त 1 विजय दूर आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्स 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत एमएस धोनीच्या ‘येलो आर्मी’साठी देखील आता प्लेऑफ फेरीतील जागा अधिक दूर नाही आहे.
दुसरीकडे, भारतात आयपीएलच्या पहिल्या टप्प्यानंतर हैदराबादच्या प्लेऑफच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या होत्या. हैदराबाद भारतात खेळलेल्या 7 सामन्यांपैकी फक्त 1 सामना जिंकू शकला होता. पण जागा बदलली तर हैदराबादचे नशीब देखील बदलले अशी चाहत्यांना अपेक्षित होते. पण हैदराबाद संघावर, विशेषत: फलंदाजांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. आणि हैदराबादला 8 सामन्यांमध्ये सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा पूर्णपणे संपल्या आहेत.