IPL 2021 Playoffs Race: कोलकाताच्या विजयाने मुंबई इंडियन्सवर प्रेशर वाढले, पण गतविजेता ‘पलटन’ लढा न देता नाही करणार पराभव स्वीकार
आयपीएलच्या 14 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला धक्का देत आणखी एका विजयाची नोंद केली. कोलकाताच्या या विजयामुळे मुंबई इंडियन्सचे टेन्शन वाढले आहे. चौथ्या क्रमांकासाठी चार संघात काट्याची टक्कर आहे. यामध्ये गतविजेता मुंबई देखील आहे जो लढा न देता कधीही पराभव स्वीकार करत नाही. मुंबईचा सामना आता राजस्थान आणि सनरायझर्सशी होईल.
IPL 2021 Playoffs Race: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) धक्का देत आणखी एका विजयाची नोंद केली. हैदराबादने पहिले फलंदाजी करत विजयासाठी दिलेले 116 धावांचे लक्ष्य कोलकाताने 4 विकेटच्या बदल्यात पार केले. या विजयामुळे कोलकाताने आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये (IPL Points Table) 12 गुणांसह चौथे स्थान आणखी भक्कम केले आहे. कोलकाताच्या या विजयामुळे मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) टेन्शन वाढले आहे. आता त्यांना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि हैदराबादविरुद्ध उर्वरित सामन्यात चांगल्या रनरेटसह विजय मिळवणे गरजेचे आहे. असे झाल्यावरच तरच ते चौथ्या स्थानाचे दावेदार बनू शकतात नाही तर त्यांनी गुणतालिकेत अन्य कोणत्या तरी क्रमांकावर समाधान मानावे लागेल. आयपीएलचे आतापर्यंत 48 सामने पूर्ण झाले असून तीन संघांनी प्लेऑफमधेशी प्रवेश केला आहे. चौथ्या क्रमांकासाठी चार संघात काट्याची टक्कर आहे. यामध्ये गतविजेता मुंबई देखील आहे जो लढा न देता कधीही पराभव स्वीकार करत नाही. (IPL 2021, KKR vs SRH: सनरायझर्सच्या पदरी पुन्हा पराभवाची निराशा, दुबईत विजयासह कोलकाता नाईट रायडर्सची प्लेऑफवर मजबूत पकड)
चेन्नई सुपर किंग्सने सर्वप्रथम प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. सीएसके 12 पैकी 9 सामने जिंकून 18 पॉईंटसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच दिल्ली देखील 18 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय 48 व्या सामन्यात पंजाब किंग्सना पराभवाची धूळ चारून बेंगलोर देखील प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. आरसीबी 12 पैकी 8 सामने जिंकून 16 पॉईंटसह तिसऱ्या स्थानावर आहे. केकेआर, पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चौथ्या स्थानासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. पण या चौघांपैकी एक संघच प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा पराभव करून जाहीर केले की ते ट्रॉफी सहज जाऊ देणार नाहीत. पण, दिल्लीविरुद्ध पराभवाने याची शक्यता कमीच दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे मुंबई जुन्या ‘पलटन’सारखी दिसत नाही. संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत जे सध्या संघर्ष करत आहेत. अशा स्थितीत केकेआर अंतिम बाजी मारेल असे दिसत आहे. तर मुंबईवर तीन वर्षानंतर पहिल्यांदा प्लेऑफमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे.
मुंबई इंडियन्सने जर त्यांचे उर्वरित दोन सामने जिंकले तर निश्चितच राजस्थान एक सामना गमावेलं. तसेच राजस्थान जर कोलकाताविरुद्ध देखील पराभूत झाली ते प्लेऑफसाठी त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. अशा स्थितीत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकासाठी कोणता संघ अंतिम बाजी मारतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)