IPL 2021: दुखापतग्रस्त अर्जुन तेंडुलकरच्या जागी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिल्लीच्या सिमरजीत सिंहची एंट्री, जाणून घ्या त्याची घरगुती कामगिरी

अर्जुन तेंडुलकर इंडियन प्रीमियर लीग 2021 मध्ये सरावा दरम्यान जखमी झाला. यामुळे मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने बुधवारी सिमरजीत सिंहला त्याच्या जागी संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली. अर्जुनच्या जागी मुंबईच्या ताफ्यात सामील झालेल्या सिमरजीत बाबत आता आपण जाणून घेणार आहोत. दिल्लीकडून खेळणारा सिमरजीत भारताच्या श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या दौऱ्यात नेट गोलंदाजांपैकी एक होता.

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सिमरजीत सिंह (Photo Credit: Twitter)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये पदार्पण करण्यासाठी अर्जुन तेंडुलकरची  (Arjun Tendulkar) प्रतीक्षा आणखी लांबणीवर पडली आहे. डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्जुन सरावा दरम्यान जखमी झाला. यामुळे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचायझीने बुधवारी सिमरजीत सिंहला (Simarjeet Singh) त्याच्या जागी संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली. मुंबई इंडियन्सने सांगितले, “मुंबई इंडियन्सने आयपीएल (IPL) 2021 च्या उर्वरित हंगामात जखमी अर्जुन तेंडुलकरच्या जागी सिमरजीतचा समावेश केला आहे. उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने आयपीएल मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनिवार्य क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर संघाबरोबर प्रशिक्षण सुरू केले आहे.” भारताचा महान फलंडनज सचिन तेंडुलकरचा 22 वर्षीय मुलगा अर्जुन अद्याप मुंबई इंडियन्ससाठी एकही खेळ खेळू शकलेला नाही. मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला लिलावात त्याच्या 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर लिलावात खरेदी केले होते. (MI Vs PBKS, IPL 2021: मुंबई इंडियन्स जिंकली! पंजाब किंग्सवर 6 विकेट्सने मिळवला विजय)

दरम्यान, अर्जुनच्या जागी मुंबईच्या ताफ्यात सामील झालेल्या सिमरजीत बाबत आता आपण जाणून घेणार आहोत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळणारा सिमरजीत सिंह हा भारताच्या श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या व्हाईट बॉल दौऱ्यात नेट गोलंदाजांपैकी एक होता. मात्र, कोविड-19 चा भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश झाल्यावर वेगवान गोलंदाजाचा टी-20 संघात समावेश करण्यात आला होता. सिमरजीतने सप्टेंबर 2018 मध्ये लिस्ट ए सामन्यात सौराष्ट्रविरुद्ध दिल्लीमध्ये पदार्पण केले. गेल्या हंगामात त्याने 28.45 च्या सरासरीने 11 विकेट्स आणि 5.65 च्या इकॉनॉमी रेटसह प्रभावी विजय हजारे ट्रॉफी हंगाम गाजवला होता. तो दिल्लीचा संयुक्त दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता.

इतकंच नाही तर दिल्लीसाठी त्याने 10 प्रथम श्रेणी, 19 लिस्ट ए आणि 15 टी -20 सामने खेळले आहेत. सिहने 37 प्रथम श्रेणी विकेट्स, 19 लिस्ट ए विकेट्स आणि 18 टी 20 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. याशिवाय त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, चार विकेट्स आणि एकदा पाच विकेट्स, तसेच लिस्ट ए मॅचमध्ये चार विकेट्स घेतल्या आहेत. या उलट अर्जुन तेंडुलकर सय्यद मुश्ताक अली करंडकात मुंबईसाठी फक्त दोन टी-20 सामने खेळला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now