IPL 2021: आरसीबीने बेकार समजून ज्याची केली हकालपट्टी, तोच आता CSK साठी करतोय धमाल, जाणून घ्या कोण आहे हा धुरंधर

आयपीएल 2020 नंतर आरसीबी संघातून काढून टाकलेल्या मोईन अलीला सीएसकेने 2021 लिलावात तगडी बोली लावून खरेदी केले. आता मोईन आपल्या क्षमतेच्या जोरावर आयपीएलमध्ये यंदा धमाल करत आहे.

मोईन अली, पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: Twitter/@IPL)

IPL 2021: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहलीने ज्या 33 वर्षीय खेळाडूची बेकार म्हणून लिलावापूर्वी संघातून हकालपट्टी केली त्याची योग्यता चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) जाणून घेतली. आयपीएल 2020 नंतर आरसीबी संघातून काढून टाकलेल्या मोईन अलीला (Moeen Ali) सीएसकेने (CSK) 2021 लिलावात तगडी बोली लावून खरेदी केले. आता मोईन आपल्या क्षमतेच्या जोरावर आयपीएलमध्ये यंदा धमाल करत आहे. मोईन अलीने गेल्या मोसमात पाच सामन्यांत 29.60 च्या सरासरीने आणि 155.78 च्या स्ट्राइक रेटने 148 धावा केल्या. यादरम्यान त्याने 17 चौकार आणि 7 षटकार लगावले. इतकेचइतकाच नाही तर मोईनने गोलंदाजीने चार विकेट्सही काढल्या. अशी सभ्य कामगिरी करूनही आरसीबीने त्याला रिलीज केले. ज्यानंतर सीएसकेने त्याला 7 कोटींमध्ये खरेदी केले. (MI vs CSK Preview: आयपीएल 2021 हंगामातील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या 27 व्या सामन्याबाबत तुम्हाला 'या' गोष्टी माहिती आहे काय?)

इंग्लंडचा अष्टपैलू मोईन 2018 पासून या लीगचा एक भाग आहे. मोईन 2018 ते 2020 या काळात आरसीबी संघाचा सदस्य होता. यादरम्यान 2018 मध्ये 5 सामन्यांत 77 धावा करण्याव्यतिरिक्त 3 विकेट्स काढल्या होत्या. मागील वर्षी त्याने 11 सामने खेळले आणि 220 धावा केल्या. शिवाय, 6 फलंदाजांना तंबूचा रस्ताही दाखवला आहे. दुसरीकडे, सीएसकेकडून खेळत मोईन अलीने बॉल आणि बॅटने शानदार कामगिरी करून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. आयपीएलमध्ये मोईनने आतापर्यंत 24 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. यादरम्यान त्याने 22.85 च्या सरासरीने आणि 157.58 च्या स्ट्राइक रेटने दोनदा नाबाद राहून 457 धावा केल्या आहेत. मोईनने एकूण 38 चौकार आणि 30 षटकार देखील ठोकलेले आहेत.

याशिवाय त्याने 24 सामन्यात 14 विकेट्सही काढले आहेत.  त्याच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीने 7 धावा देऊन 3 विकेट्स आहे जी त्याने यंदाच्या 14व्या मोसमात केली आहे. आता सीएसके मोईन अलीचा पुरेपूर फायदा करून घेत आहे. मोईन अली आणि रवींद्र जडेजाची जोडी जोरदार मैदानात शानदार कामगिरी बजावत आहे.