IPL 2021, MI vs SRH: मुंबई इंडियन्सना प्लेऑफमध्ये जायचे असल्यास आज ‘या’ खेळाडूंना करावी लागणार कमाल

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीपूर्वी गतविजेता मुंबईला अशक्य असा विजय मिळवून प्लेऑफमध्ये नेण्यासाठी संघात ज्या खेळाडूंना कमाल लागणार त्यांच्यावर एक नजर टाकूया.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: Twitter/@IPL)

आयपीएल (IPL) 2021 मध्ये आज अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख जायद स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) होणार आहे. यंदाच्या मोसमात दोन्ही संघांचा प्रवास फार खास राहिला नाही. कोलकाता नाईट रायडर्सच्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजयानंतर पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर पडली आहे. 'प्लेऑफ' मध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई इंडियन्सला हैदराबादविरुद्ध एका चमत्काराची आवश्यकता आहे जे कदाचित अशक्य आहे. मुंबई इंडियन्सची या स्पर्धेत चांगली गोलंदाजी होती, ज्याने मोठा प्रभाव पाडला पण फलंदाजीने दुसऱ्या लेगमध्ये खूप निराशा केली. दोन्ही संघांसाठी हा सामना अभिमानाचा असेल. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीपूर्वी गतविजेता मुंबईला अशक्य असा विजय मिळवून प्लेऑफमध्ये (IPL Playoffs) नेण्यासाठी संघात ज्या खेळाडूंना कमाल लागणार त्यांच्यावर एक नजर टाकूया. (IPL 2021: मुंबई इंडियन्सच्या जेतेपदाची हॅटट्रिक अशक्य, जाणून घ्या प्लेऑफचे हे मजेदार समीकरण)

ट्रेंट बोल्ट (Trent Boult)

आयपीएल 2021 मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टसाठी वाईट ठरला आहे. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन अशाप्रकारे बाहेर पडल्यामुळे त्यांच्या अनुभवी गोलंदाजावर प्रश्न निर्माण होत आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्याने त्यांचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल की नाही हे निश्चित होईलच परंतु ट्रेंट बोल्ट प्रभावी कामगिरी करण्यावर अधिक भर देईल.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)

मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज बुमराहने 13 सामन्यांमध्ये स्पर्धेत 19 विकेट्स घेतल्या आहेत पण तरीही त्याचा संघ काही विशेष प्रभाव पाडू शकला नाही. जसप्रीत बुमराह सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चांगली कामगिरी करेल अशी फ्रँचायझीला अपेक्षित असेल.

रोहित शर्मा (Rohit Sharma)

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा देखील या मोसमात त्याच्या नेतृत्वाने फार काही करू शकला नाही. रोहितने फलंदाज म्हणून 12 सामन्यांमध्ये 360 धावा केल्या आहेत ज्यात 1 अर्धशतकाचा समावेश आहे. सर्वांना रोहित शर्माकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

नॅथन कुल्टर नाईल (Nathan Coulter-Nile)

मुंबई इंडियन्स ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर-नाईलचा योग्य उपयोग करू शकली नाही, तरी वेगवान गोलंदाजाने राजस्थान रॉयल्सविरुद्ध एका सामन्यात 4 विकेट घेतल्या. त्यामुळे, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात तो कशी कामगिरी करतो हे पाहणे रंजक ठरेल.

जेम्स नीशम (James Neesham)

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने गेल्या 5 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत आणि अष्टपैलू म्हणून फ्रँचायझीला त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या पण तो पूर्ण करू शकला नाही. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात संघाच्या मोहिमेचा शेवट करण्याकडे नीशमचे लक्ष असेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif