IPL 2021, MI vs DC: शारजाहमध्ये रोहित शर्मा-Rishabh Pant यांचा ‘याराना’, टॉस दरम्यान ‘हिटमॅन’ने पंतची काढली छेड (Watch Video)

पंत आणि रोहित मैदानावर तसेच मैदानाबाहेर चांगले मित्र आहे हे क्रिकेट प्रेमींना चांगलेच ठेवून असेल. दोघांमधील ‘याराना’ क्रिकेट चाहत्यांमध्ये परिचित आहे. आणि आज टॉस दरम्यान याची एक झलक पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळाली.

रोहित शर्मा आणि रिषभ पंत (Photo Credit: Twitter)

IPL 2021, MI vs DC: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 स्पर्धेत आज शारजाह (Sharjah) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 46 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे. 5 वेळा आयपीएल (IPL) खिताब पटकावलेला मुंबईचा संघ यंदा प्लेऑफमध्ये जाण्यापासून वंचित राहिल अशी शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, दिल्लीने यापूर्वीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. शारजाह येथे आजच्या सामन्याच्या टॉस दरम्यान मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि दिल्ली कॅपिटल्स कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्यात मजेदार किस्सा पाहायला मिळाला. पंत आणि रोहित मैदानावर तसेच मैदानाबाहेर चांगले मित्र आहे हे क्रिकेट प्रेमींना चांगलेच ठेवून असेल. दोघांमधील ‘याराना’ क्रिकेट चाहत्यांमध्ये परिचित आहे. आणि आज टॉस दरम्यान याची एक झलक पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळाली. (IPL 2021, MI vs DC: रिषभ पंतने जिंकला टॉस, मुंबई इंडियन्सला दिले फलंदाजी आमंत्रण; मुंबई-दिल्लीच्या ताफ्यात 1-1 बदल)

नाणेफेकीत पंतने बाजी मारली आणि डीसी कर्णधाराने पटकन आपला निर्णय सांगून गोंधळ घातला. पंत म्हणाला, “आम्ही आधी गोलंदाजी करणार आहोत”. पंतचे शब्द ऐकून मुंबई इंडियन्सचा कर्णधार थोडा गोंधळून गेला आणि त्याला विचारले “आम्ही गोलंदाजी करणार?”. पंतला ते मजेदार वाटले आणि नंतर स्पष्ट, मंद स्वरात पुष्टी केली की DC आधी गोलंदाजी करणार आहे. रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांच्यासह मुरली कार्तिक, जे टॉस ड्यूटीसाठी त्यांच्या जवळ होते, त्यांनाही हसू फुटले. यष्टीरक्षक म्हणाला की शारजामध्ये धावांचा पाठलाग करणे हा एक उत्तम पर्याय आहे.

दरम्यान, डीसी प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे आणि 16 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तथापि, असे असूनही ते मुंबईला हल्ल्यात घेणार नाही. संयुक्त अरब अमिरातीच्या लेगमध्ये 4 सामन्यांपैकी एक सामना जिंकणाऱ्या मुंबईने आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 10 गुण मिळवले आहेत आणि ते कोलकाता नाईट रायडर्स व पंजाब किंग्स यांच्यासह चौथ्या स्थानावर बरोबरीत आहेत. परंतु केकेआर व पंजाबचा दोनपेक्षा नेट रनरेट मुंबईपेक्षा चांगला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्रत्येकी एक बदल केला आहे: दिल्ली कॅपिटल्सने ललित यादवला बाहेर करून पृथ्वी शॉला संघात सामील केले आहे. तर मुंबईने राहुल चाहरच्या जागी जयंत यादवचा समावेश केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif