IPL 2021, MI vs DC Likely Playing XI: दिल्लीविरुद्ध निर्णायक सामन्यात मुंबई इंडियन्स SuryaKumar Yadav ला दाखवणार बाहेरचा रस्ता?
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म आयपीएल 2021 मध्ये मुंबईच्या अपयशामागील मुख्य कारणांपैकी एक आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध यादवने मोठी खेळी करणे आवश्यक आहे कारण मुंबईला या सामन्यात कोणतीही चूक महागात पडू शकते. त्यामुळे दिल्लीविरुद्ध मुंबई इंडियन्स सूर्यकुमारला बाहेर करते की नाही हे पाहणे मनोरंजक असणार आहे.
IPL 2021, MI vs DC Likely Playing XI: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) स्थिती ‘करो या मरो’ची झाली आहे. मुंबईने 11 पैकी पाच सामने जिंकले असून त्यांचे 10 गुण आहेत. पाच वेळा आयपीएल (IPL) विजेते मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच विशेष खेळ करू शकले नाही. यामागे मुख्य कारण म्हणजे खेळाडू त्यांच्या कामगिरीत सातत्य कायम ठेवू शकले नाही. संघाचे युवा फलंदाज ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) युएई (UAE) आवृत्तीत प्रभाव पाडू शकले नाही. गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पुढील सामना मंगळवारी, 28 सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्सशी (Delhi Capitals) होणार आहे. त्यांना शेवटच्या सामन्यापासून विजयाची गती सुरू ठेवण्यासाठी गटातील आता उर्वरित तीनही सामने जिंकणे गरजेचे आहे. फॉर्मात नसलेल्या सूर्यकुमार यादवने मोठी खेळी करणे आवश्यक आहे कारण मुंबईला या सामन्यात कोणतीही चूक महागात पडू शकते. अशा स्थितीत दिल्लीविरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्स सूर्यकुमारला बाहेर करते की नाही हे पाहणे मनोरंजक असणार आहे. (IPL 2021 Playoffs Race: आयपीएल प्लेऑफचे चित्र स्पष्ट, CSK ने जिंकली पहिली बाजी तर 6 संघात तिसऱ्या स्थानासाठी चुरशीची लढाई, पहा स्पर्धेचे समीकरण)
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा सूर्यकुमार शेवटच्या 4 डावांमध्ये दुहेरी अंकही स्पर्श करू शकला नाही. दरम्यान, हार्दिक पांड्या चेंडूने योगदान देण्यास असमर्थतेमुळे मुंबईच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात सूर्यकुमार यादव लयीत परतण्याच्या अपयशी ठरला आहे. दुसरीकडे, मुंबईने प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्यास सूर्यकुमार यादवची पोकळी भरून काढण्यासाठी दुसरा खेळाडू नाही. कारण ईशान किशन यूएईमध्ये आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला असून आणि संघातील इतर खेळाडूंना तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा अनुभव नाही आहे. सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म आयपीएल 2021 मध्ये मुंबईच्या अपयशामागील मुख्य कारणांपैकी एक आहे. 5 वेळा चॅम्पियन्स 11 सामन्यांत केकेआरसोबत एकूण 10 गुणांसह बरोबरीत आहे. तथापि, मॉर्गन आणि कंपनी चांगल्या नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. तसेच आयपीएल 2021 च्या शेवटच्या दोन आठवड्यांत प्रवेश करताना यादवने फक्त एक गोष्ट पुरवणे आवश्यक आहे आणि ते म्हणजे मुंबईसाठी फलंदाजीने धावफलकावर मोठी धावसंख्या नोंदवणे. दरम्यान, दिल्लीविरुद्ध सामन्यात मुंबई आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणे कमीच अपेक्षित आहे.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, किरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, नॅथन कुल्टर-नाईल, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.