IPL 2021: आयपीएल दे दणादण! Kieron Pollard ने ठोकला 14व्या मोसमातला सर्वात उत्तुंग षटकार, पहा टॉप-5 लांब सिक्स

दरवर्षीप्रमाणे यंदाही खेळाडू मैदानात आतिशी खेळी करत आहेत. यादरम्यान, फलंदाजांकडून गोलंदाजांची धुलाई होताना दिसत आहे. याच मालिकेत मुंबई इंडियन्सचा कॅरेबियन अष्टपैलू किरोन पोलार्डने शानदार फलंदाजी केली आणि 105 मीटर उंच षटकार लगावला, जो यांच्या हंगामातील आतापर्यंतचा सर्वात मोठा षटकार ठरला आहे.

कीरोन पोलार्ड (Photo Credit: PTI)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा थरार सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही खेळाडू मैदानात आतिशी खेळी करत आहेत. यादरम्यान, फलंदाजांकडून गोलंदाजांची धुलाई होताना दिसत आहे. याच मालिकेत शनिवारी चेन्नई (Chennai) येथे आयपीएल (IPL) गतविजेते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई संघाचा कॅरेबियन अष्टपैलू किरोन पोलार्डने (Kieron Pollard) शानदार फलंदाजी केली आणि 105 मीटर उंच षटकार लगावला, जो यांच्या हंगामातील आतापर्यंतचा सर्वात मोठा षटकार ठरला आहे. या सर्वांमध्ये यंदाच्या हंगामात सर्वात उत्तुंग सिक्स लागणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे तर टॉप-5 यादीत दोन विदेशी फलंदाज असून अन्य तीन विदेशी खेळाडू आहेत. (IPL 2021: Kieron Pollard बनला मुंबई इंडियन्सच्या षटकारांचा ‘राजा’, SRH विरुद्ध केला अफलातून कारनामा)

किरोन पोलार्ड (Kieron Pollard)

या यादीमध्ये वेस्ट इंडीज संघाचा अष्टपैलू खेळाडू पोलार्डचे नाव सध्या आघाडीवर आहे. हैदराबादविरुद्ध सामन्यात पोलार्डने अनुभवी आंतरराष्ट्रीय फिरकीपटू मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर 105 मीटर लांब 6 षटकार ठोकला. या सामन्यात पोलार्डने नाबाद 35 धावांच्या खेळीचा सामना केला. त्याने 22 चेंडूंचा सामना करताना एक चौकार आणि 3 षटकारासह 22 धावा फटकावल्या.

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxawell)

या यादीतील दुसरे मोठे नाव आहे ऑस्ट्रेलियाचा धाड फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचे आहे. आयपीएल 14च्या मोसमातील सलामीच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात मॅक्सवेलने 100 मीटर उंच सिक्स खेचला होता.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)

मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. यादवने कोलकाता नाईट रायडर्सच्या पॅट कमिन्सच्या गोलंदाजी वर 99 मीटर उंच षटकार मारला होता.

मनीष पांडे (Manish Pandey)

सनरायझर्स हैदराबादचा मनीष पांडेचा देखील या यादीत समावेश आहे. या हंगामात पांडेने आतापर्यंत 96 मोठा षटकार खेळला आहे.

अब्दुल समद (Abdul Samad)

या यादीत सनरायझर्सचा 19-वर्षीय अब्दुल समद संघाचा दुसरा मोठा खेळाडू आहे. या हंगामात समदने आतापर्यंत 93 मीटर उंच इतका सिक्स खेळला आहे.

दरम्यान, अब्दुल समदच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने देशाच्या या प्रतिष्ठित स्पर्धेत आतापर्यंत 15 सामन्यात 19.6 च्या सरासरीने 137 धावा केल्या आहेत. आयपीएलमधील त्याची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी 33 धावांची आहे. याशिवाय गोलंदाजीत त्याने तितक्याच सामन्याच्या तीन डावांमध्ये एक विकेट घेतली आहे.