IPL 2021: यंदाच्या सीजनमध्ये Mumbai Indians चे ‘हे’ 3 मॅच विनर खेळाडू ठरत आहे ‘सुपर फ्लॉप’, दाखवला पाहिजे बाहेरचा रस्ता

गतविजेत्या मुंबई इंडियन्स पाच सामन्यातील तीन पराभव व दोन विजयांसह चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, आता अशी वेळ आली आहे की संघात सतत फ्लॉप होत राहणाऱ्या काही खेळाडूंना काही काळ संघातून वगळण्याची वेळ आली आहे. सातत्याने फ्लॉप होत असलेले हे तीन खेळाडू खालीलप्रमाणे आहेत.

कीरोन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या विजेतेपदासाठी लढाई सुरू झाली आहे. पाच वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आयपीएलचा सलामीचा सामना खेळला गेला. यामध्ये मुंबईला 2 विकेटने पराभवाचे तोंड पाहावे लागले. पाच सामन्यातील तीन पराभव व दोन विजयांसह मुंबई सध्या (-0.032) चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आतापर्यंत कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि राहुल चाहर यांच्यासारख्या खेळाडूंनीच आपल्या खेळीने प्रभावित केले आहेत. अशा परिस्थितीत, आता अशी वेळ आली आहे की संघात सतत फ्लॉप होत राहणाऱ्या मॅच-विनर खेळाडूंना काही काळ संघातून वगळण्याची वेळ आली आहे. सातत्याने फ्लॉप होत असलेले हे तीन खेळाडू खालीलप्रमाणे आहेत. (IPL 2021: मुंबई इंडियन्सला आतापर्यंत कोणत्या 3 संघांनी सर्वाधिक वेळा चारली आहे पराभवाची धूळ माहीत आहे का?)

हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

आयपीएलचा 14 वा हंगाम मुंबईचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासाठी फारसा चांगला ठार नाही आहे. या हंगामात पांड्या आतापर्यंत वाईटरित्या फ्लॉप झाला असून त्याने संघासाठी पाच सामन्यांमध्ये 7.20 च्या सरासरीने केवळ 36 धावा केल्या आहेत. पांड्याच्या स्ट्राईक रेटवरही फार परिणाम झाला आहे. त्यामुळे पांड्याऐवजी मुंबई संघाने दुसर्‍या खेळाडूला संधी द्यायची अशी वेळ आली आहे.

ईशान किशन (Ishan Kishan)

आयपीएल 2020 मध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पडणाऱ्या ईशान किशनची बॅट यंदा शांत आहे. किशनने या मोसमात संघासाठी 5 सामने खेळले असून 14.60 च्या सरासरीने 73 धावा केल्या. किशन पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या मागील सामन्यात धावा करण्यासाठी झुंज देताना दिसला. अशा परिस्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये मुंबईने त्याच्या जागी दुसरा खेळाडूचा शोध घेणे गरजेचे आहे.

क्विंटन डी कॉक (Quinton de Kock)

गेल्या काही मोसमात मुंबईच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या आफ्रिकेचा विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉक यंदा काही खास कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. या मोसमात त्याने संघासाठी चार सामन्यात 11.75 च्या सरासरीने 47 धावा केल्या असून यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 87.03 होता.

मुंबई इंडियन्स पाच विजेतेपदासह आयपीएलच्या इतिहासातील आजवरचा सर्वात यशस्वी संघ आहे. 2020 मध्ये युएई येथे आयोजित आयपीएल फायनल सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत रेकॉर्ड विजेतेपद जिंकले होते त्यामुळे यंदाच्या मोसमात गेतविजेत्या संघाला सहावे ये विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याची सुवर्ण संधी आहे. अशाप्रकारे या मॅच-विनर खेळाडूंच्या कामगिरीत सुधार न झाल्यास संघाच्या हॅटट्रिकचे स्वप्न भंग होऊ शकते.