IPL 2021: आयपीएलमध्ये अद्याप ‘या’ 3 कॅप्ड खेळाडूंना नाही मिळाली जलवा दाखवण्याची संधी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आहेत ‘गेमचेंजर’

हर्षल पटेल, अवेश खान, वरुण चक्रवर्ती, चेतन सकारिया आणि इतर युवा अनकॅप्ड खेळाडूंनी आतापर्यंत या स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावली आहे ज्यामुळे कॅप्ड खेळाडूंची यंदाचे आयपीएल खेळण्याची प्रतीक्षा मात्र लांबणीवर पडली आहे. आज आपण या लेखात अशाच 3 कॅप्ड खेळाडूंवर नजर टाकणार आहोत.

चेतेश्वर पुजारा (Photo Credit-Instagram/chennaiipl)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 14 वा हंगाम अनकॅप्ड खेळाडूंसाठी वरदान ठरला आहे. हर्षल पटेल, अवेश खान, वरुण चक्रवर्ती, चेतन सकारिया आणि इतर युवा अनकॅप्ड खेळाडूंनी आतापर्यंत या स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावली आहे ज्यामुळे कॅप्ड खेळाडूंची यंदाचे आयपीएल खेळण्याची प्रतीक्षा मात्र लांबणीवर पडली आहे. निकोलस पूरन, सुनील नारायण आणि शुबमन गिल अद्याप संघासाठी काही विशेष कामगिरी करू शकले नसताना असे अनेक कॅप्ड खेळाडू सध्या बसून आहे ज्यांना आद्यपही या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशासाठी ‘गेमचेंजर’ म्हणून प्रभावी कामगिरी बजावणारे खेळाडू देखील सामील आहे. आज आपण या लेखात अशाच 3 कॅप्ड खेळाडूंवर नजर टाकणार आहोत. (IPL 2021: लिलावात मिळाला कोट्यवधींचा भाव पण ‘या’ 3 खेळाडूंना अद्याप नाही मिळाली मैदानात उतरण्याची संधी)

1. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)

चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) 50 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर विकत घेतलेल्या चेतेश्वर पुजाराला अद्याप आपली पहिली यलो कॅप मिळालेली नाही. त्याला सीएसके संघात अंबाती रायुडूची चौथी जागा मिळेल ज्याने 7 सामन्यात 136 धावा केल्या आहेत. एमएस धोनी आपल्या संघात अधिक बदल करण्यासाठी ओळखला जात नाही त्यामुळे रायुडूला बाहेर करण्याची शक्यता देखील कमी आहे. त्यामुळे या हंगामात पुजाराला एखादा खेळ मिळण्याची अपेक्षा नाही आहे. पुजारा कसोटी विशेषज्ञ मानला जातो आणि 2014 पासून आयपीएल सामना खेळला नाही.

2. जेसन रॉय (Jason Roy)

मिचेल मार्शच्या जागी बदली म्हणून आलेल्या जेसन रॉयला चकित करत सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) अद्याप बेंचवर बसवून ठेवलेले आहे. रॉयने 235 टी-20 सामन्यात 142.47 च्या स्ट्राईक-रेटने 6085 धावा केल्या आहेत. शिवाय, सनरायझर्सने डेविड वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमधूनही बाहेर केले असल्याने रॉयला संधी मिळण्याची शक्यता होती जी अद्याप सत्यतेत उतरू शकली नाही. त्यामुळे रॉयला हैदराबाद संघात अखेर संधी कधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

3. फिन अ‍ॅलन (Finn Allen)

न्यूझीलंड (New Zealand) सलामीवीरने आयपीएल 2021 च्या अगदी आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जोश फिलिपची बदली म्हणून त्याला साइन करण्यात आले होते आणि अद्याप त्याला आयपीएलमध्ये (IPL) पदार्पणाची संधी मिळालेली नाही. आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्क्लने काही प्रसंगी चांगली कामगिरी केली असून व्यवस्थापनाने क्वचितच संघात बदल करणे अपेक्षित आहे. म्हणूनच, अ‍ॅलन आयपीएलमध्ये कमीतकमी यंदाच्या हंगामात तरी अनकॅप्ड राहण्याची शक्यता आहे. त्याने 16 टी-20 मध्ये 625 धावा केल्या आहेत.