IPL Auction 2025 Live

IPL 2021 Final, CSK vs KKR: कोणाची खेळी कोरेल आयपीएल चषकावर नाव? अंतिम लढतीत 'या' 6 खेळाडूंवर मोठी जबाबदारी

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. फायनल सामन्याच्या काही तासांपूर्वी दोन्ही संघातील प्रत्येकी 3 खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत जे चेन्नई किंवा कोलकातासाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतात.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

IPL 2021 Final, CSK vs KKR: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 14 वा हंगाम आज म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. आयपीएलच्या (IPL) 14 व्या मोसमातील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स  (Kolkata Knight Riders) यांच्यात दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यासह कोरोनाने बाधित स्पर्धा संपुष्टात येईल. पण तुम्हाला माहित आहे की या शीर्षक सामन्यात कोणते खेळाडू या फायनल सामन्याला आणखी खास बनवू शकतात आणि आपल्या संघाला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. अशा स्थितीत फायनल सामन्याच्या काही तासांपूर्वी दोन्ही संघातील प्रत्येकी 3 खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत जे चेन्नई किंवा कोलकातासाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतात. (IPL 2021, CSK vs KKR Final: Eoin Morgan वर का आहे MS Dhoni भारी, फायनलपूर्वी माजी KKR कर्णधाराचे मोठे विधान)

सर्वात पहिले जर आपण चेन्नई सुपर किंग्ज संघाबद्दल बोलायचे झाले तर सर्वांच्या नजरा सलामीवीर रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), फाफ डु प्लेसिस आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्यावर असतील. या तीन तडाखेबाज खेळाडूंच्या फॉर्मच्या जोरावर चेन्नईच्या संघाने अंतिम फेरीचा प्रवास केला आहे आणि अशा स्थितीत पुन्हा एकदा या त्रिकुटावर जेतेपदाच्या सामन्यात कामगिरीची जबाबदारी असेल. तसेच आतापर्यंत स्पर्धेत 603 धावा करणाऱ्या गायकवाडला आयपीएल 2021 ची ऑरेंज कॅपवर काबीज करण्याची संधी आहे, तर डु प्लेसिस देखील 547 धावा करून या शर्यतीत आहे. जडेजाबद्दल बोलायचे झाले तर त्याने 12 डावांमध्ये 227 धावा केल्या आहेत आणि 11 विकेटही घेतल्या आहेत.

दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सबद्दल बोलायचे झाले तर सलामीवीर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer), अष्टपैलू सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) या संघासाठी गेम चेंजर खेळाडू सिद्ध होऊ शकतात. या तीन खेळाडूंनी संपूर्ण हंगामात केकेआरसाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत जेतेपदाच्या विजयात त्यांचे योगदान केकेआरच्या ताफ्याला महत्वपूर्ण ठरू शकते. युएई आवृत्ती दरम्यान आयपीएल पदार्पण करत अय्यरने 9 सामन्यांमध्ये 320 धावा केल्या आहेत, तर नारायणला फक्त 60 धावा करता आल्या आहेत आणि त्याने 14 विकेट घेतल्या आहेत.  मात्र तो मोक्याच्या क्षणी संघासाठी बॅट व बॉलने उपयुक्त ठरू शकतो. नारायणची बॅट शांत असली तरी प्रत्येकाला माहीत आहे की तो मॅचला निकाल बदलू शकतो. तर चक्रवर्तीकडून केकेआरला आणखी एक मॅचविनिंग परफॉर्मन्स देण्याची अपेक्षा असेल. त्याने आतापर्यंत 16 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत.