IPL 2021: SRH संघाच्या फक्त ‘या’ खेळाडूची Delhi Capitals ना भीती, सामन्यापूर्वी प्रशिक्षकाने सांगितला गेम प्लान

5.06 च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने आतापर्यंत 5 सामन्यात 4 विकेट घेणाऱ्या राशिद खानपासून सावध राहण्याची गरज असल्याचं कैफने म्हटलं आहे.

सनरायजर्स हैदराबाद (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाविरुद्ध आयपीएलच्या (IPL) 20व्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) यांनी आपल्या फलंदाजांना अफगाण फिरकीपटू राशिद खानच्या  (Rashid Khan) फिरकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. दिल्ली कॅपिटल्स रविवारच्या डबल-हेडरच्या दुसऱ्या सामन्यात काही दिवसांपूर्वी चेन्नईत झालेल्या मोसमातील पहिला विजय नोंदवणाऱ्या सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. 5.06 च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने आतापर्यंत 5 सामन्यात 4 विकेट घेणाऱ्या राशिद खानपासून सावध राहण्याची गरज असल्याचं कैफने म्हटलं आहे. तथापि, माजी भारतीय फलंदाजाला आपल्या फलंदाजांवर विश्वास आहे की ते फक्त खानच्या धोक्यावर विजय मिळवू शकत नाही तर चेपॉकच्या (Chepauk) ट्रॅकवरही वर्चस्व गाजवतील जिथे त्यांनी यापूर्वी संपूर्ण योजनेसह मुंबई इंडियन्सचा 6 विकेटने पराभव केला होता. (IPL 2021: दुखापतग्रस्त T Natarajan याच्या जागी सनरायझर्स हैदराबाद संघात ‘हे’ 3 तगडे ठरू उपयुक्त पर्याय)

“आम्ही खेळपट्टीवर राशिद खानला ज्या पद्धतीने खेळतो ते आमच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. या खेळपट्टीवर (चेन्नईत) फलंदाजी करणे कठीण होते, पण आमच्याकडे अनुभवी फलंदाजीक्रम आहे,” मोहम्मद कैफ यांनी फ्रँचायझीद्वारे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. “शिखर चांगली फलंदाजी करत आहे आणि शेवटच्या सामन्यात स्मिथने चांगली फलंदाजी केली. शेवटच्या सामन्यात अमित मिश्राने सुंदर गोलंदाजी केली आणि रविचंद्रन अश्विनही आमच्याकडे आहे. शेवटच्या सामन्यात मार्कस स्टोइनिसने नवीन बॉलसह चांगली गोलंदाजी केली आणि रिषभ ज्या प्रकारे विशेषतः वळण घेण्याच्या मार्गावर नेतृत्व करत आहे ते एक उत्तम चिन्ह आहे,” कैफ यांनी पुढे म्हटले. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्यापूर्वी दिल्लीसाठी चांगली बातमी म्हणजे अक्षर पटेल कोविड-19 मधून सावरला असून सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे दिल्लीने श्रेयस अय्यर, अक्षर व एनरिच नॉर्टजे यांच्याशिवाय 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत.

दरम्यान, कोविड-19 मधून सावरल्यानंतर अष्टपैलू अक्षर पटेलच्या दिल्ली कॅपिटल संघात कमबॅकबाबत विचारले असता ते म्हणाले, “दिल्ली कॅपिटल्सचे संतुलन आता परिपूर्ण आहे. या फ्रँचायझीचा तो एक महत्वपूर्ण सदस्य राहिला आहेत. गेल्या हंगामात त्याने संघाच्या उपविजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि हे वर्ष यापेक्षा वेगळे असेल.”