IPL 2021, CSK vs PBKS: कर्णधार KL Rahul च्या तुफानी अर्धशतकाने पंजाबचा दणकेबाज विजय, चेन्नईवर 6 विकेटने केली मात

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने सहा विकेट गमावून अवघ्या 134 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात पंजाबने 13 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून हे लक्ष्य सध्य केले. पंजाबच्या विजयात कर्णधार राहुलने बजावली.

केएल राहुल (Photo Credit: PTI)

कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) तुफानी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने (Punjab Kings) एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 6 विकेटने मात केली. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने सहा विकेट गमावून अवघ्या 134 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात पंजाबने 13 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून हे लक्ष्य सध्य केले. पंजाबच्या विजयात कर्णधार राहुलने बजावली. राहुलने 25 चेंडूत अर्धशतकी पल्ला गाठला आणि अखेर 42 चेंडूत 98 धावा करून नाबाद राहिला. तसेच मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) 12 तर मार्करमने 13 धावा केल्या. दुसरीकडे, फलंदाजांनंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी देखील निराशाजनक खेळी केली. शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) तीन विकेट घेतल्या. तर दीपक चाहरने एक विकेट घेतली. दरम्यान पंजाबविरुद्ध या पराभवामुळे प्लेऑफमध्ये क्वालिफाय केलेल्या चेन्नईच्या गुणतालिकेतील स्थितीवर फारसा परिणाम झाला नाही. त्यांचे पॉईंट टेबलवर दुसरे स्थान कायम आहे. याशिवाय पंजाबने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. (IPL 2021: ‘असे’ झाल्यास सामना न खेळताच गतविजेता मुंबई इंडियन्सचे प्लेऑफ रेसमधून होणार आऊट)

दुबई येथे चेन्नईने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी पंजाबचे सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल फलंदाजीसाठी मैदानात उतरले. राहुलने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली तर मयंक संधी फलंदाजी करून त्याला साथ देताना दिसला. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी झाली. या दरम्यान ठाकूरने एकाच ओव्हरमध्ये पहिले मयंकला पायचीत करून चेन्नईला पहिले यश संपादन करून दिले. त्यांनतर ओव्हरच्या अंतिम चेंडूवर सरफराज खानला भोपळा फोडू न देता पॅव्हिलियनमध्ये धाडले. ठाकूरच्या मागे चाहर देखील चेन्नईच्या मदतीला आला आणि शारुख खानला 10 चेंडूत 8 धावांवर माघारी पाठवले. मात्र कर्णधार राहुल एक टोक धरून धमाकेदार अर्धशतक ठोकले. संघ विजयाचा जवळ पोहोचला असताना मार्करमला ठाकूरने बाद केले. पण राहुलने अखेरीस संघाला विजयीरेष ओलांडून दिली.

यापूर्वी मात्तबर खेळाडूंनी सज्ज असलेल्या चेन्नईचा फलंदाजी क्रम ढासळला. पण सलामीवीर फाफ डु प्लेसिसने मात्र एकहाती खिंड लढवत 76 धावा ठोकल्या आणि चेन्नईला 135 धावांपर्यंत मजल मारून दिली.