IPL 2021 CSK vs MI Match 30: चेन्नईचा पलटवार! मुंबईचा 20 धावांनी पराभव करत दुसऱ्या पर्वाची केली विजयी सुरुवात
मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलच्या उत्तरार्धाची सुरुवात झाली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने बॉलने पलटवार करत 20 धावांनी दुसऱ्या पर्वाच्या सुरुवातीला दणदणीत विजय मिळवला. रुतुराज गायकवाडने एकाकी झुंज देत चेन्नईला 156 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात मुंबई 20 ओव्हरमध्ये 136/8 धावाच करू शकला.
IPL 2021 CSK vs MI Match 30: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध आयपीएलच्या (IPL) उत्तरार्धाची सुरुवात झाली आहे. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) बॉलने पलटवार करत 20 धावांनी दुसऱ्या पर्वाच्या सुरुवातीला दणदणीत विजय मिळवला. चेन्नईच्या विजयात रुतुराज आणि गोलंदाजांनी महत्वाची भूमिका बजावली. टॉस जिंकून फलंदाजी करणाऱ्या चेन्नईचे सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर रुतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) एकाकी झुंज देत संघाला 156 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात मुंबई 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 136 धावाच करू शकला. सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) 50 धावा करून नाबाद राहिला. तर क्विंटन डी कॉक 17, अनमोलप्रीत सिंह 16 धावाच करू शकले. याशिवाय संघाचे अन्य धाकड फलंदाज दहाचा आकडाही स्पर्श करू शकले नाही. दुसरीकडे, चेन्नईसाठी ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) 3 तर दीपक चाहरने (Deepak Chahar) 2 विकेट्स घेतल्या. तसेच जोश हेजलवूड, शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट काढली. (Ruturaj Gaikwad ची उत्कृष्ट कामगिरी, यूएईच्या मैदानावर सलग चौथ्यांदा 50 हून अधिक धावा करणारा ठरला पहिला खेळाडू)
चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून डी कॉक आणि पदार्पणवीर अनमोलप्रीत ची जोडी सलामीला उतरली. मात्र, ही जोडी फार काळ टिकू शकली नाही. डी कॉकला चाहरने तिसऱ्या षटकात 17 धावांवर पायचीत केले. तर चाहरनेच आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अनमोलप्रीतला 16 धावांवर त्रिफळाचीत करत मुंबईला दुसरा धक्का दिला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या सूर्यकुमारला ठाकूरने बाद करत स्वस्तात माघारी धाडले. यानंतर मुंबई फलंदाजांच्या पडझड सुरूच राहिली. काहीवेळी सौरभ तिवारी आणि ईशान किशन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रावोने 11 धावांवर किशनला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. हेजलवुडने पोलार्डला बाद करत मुंबईचा अर्धा संघ तंबूत धाडले. कृणाल पांड्याला धाव घेताना नॉन स्ट्राईकरवर असणाऱ्या तिवारीसोबत योग्य ताळमेळ साधता न आल्याने ब्रावोने त्याला धावचीत केलं. अखेरीस तिवारीने अॅडम मिल्नेसह काही शॉट्स खेळत संघाला विजयाच्या जवळ नेले मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. मिल्ने 15 धावा करून परतला.
दुसरीकडे, पहिले फलंदाजीला उतरलेल्या चेन्नईची सुरुवात देखील खराब झाली. सीएसकेने फक्त 3 ओव्हरमध्ये 7 धावांवर तीन मोठ्या विकेट गमावल्या. मात्र संघ अडचणीत असताना युवा सलामीवीर रुतुराज गायकवाडने जबाबदारीने फलंदाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. रुतुराजने 58 चेंडूत सर्वाधिक 88 धावा ठोकल्या. तसेच रवींद्र जडेजाने 26 आणि ड्वेन ब्रावोने 23 धावांचे योगदान दिले.
(The above story first appeared on LatestLY on Sep 19, 2021 11:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

