IPL 2021: चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचा क्वारंटाईन पूर्ण, जाणून घ्या दोन्ही संघ कधीपासून सुरू करतील ट्रेनिंग
चेन्नई गुरुवारपासून दुबईतील आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये सरावाला सुरुवात करेल. तसेच गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघ शुक्रवारपासून शेख जायद स्टेडियमवर आपली तयारी सुरु करेल. गेल्या आठवड्यात चेन्नई आणि मुंबईतील संघ यूएईला पोहोचले होते.
एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी युएई (UAE) येथे पोहचला असून त्यांनी क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. यासह दोन्ही संघ आता आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला लागणार आहेत. चेन्नई गुरुवारपासून दुबईतील (Dubai) आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये (ICC Cricket Academy) सरावाला सुरुवात करेल. तसेच गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघ शुक्रवारपासून शेख जायद स्टेडियमवर (Sheikh Zayed Stadium) आपली तयारी सुरु करेल. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना, या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की दोन्ही संघांनी त्यांचा 6 दिवसांचा अलग ठेवण्याचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे आणि दोन्ही संघ तयारी सुरु करतील. (IPL 2021: Rishabh Pant की Shreyas Iyer, आयपीएल 2021 दुसऱ्या टप्प्यासाठी दिल्ली कॅपिटल्सपुढे कर्णधार नियुक्तीचा पेच)
सूत्रांनी सांगितले की, “दोन्ही संघांनी क्वारंटाईन प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आणि आयपीएलची तयारी सुरु करणार आहेत. सीएसके दुबई येथील आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये आज रात्रीपासून प्रशिक्षण सुरु करेल. दुसरीकडे, मुंबई संघ शुक्रवारपासून शेख जायद स्टेडियममधील प्रशिक्षण सुविधेत प्रशिक्षण घेण्यास सुरुवात करेल. गेल्या वर्षीचा उपविजेता दिल्ली कॅपिटल्स (DC) संघ शनिवारी यूएईला पोहचेल. “देशांतर्गत खेळाडू आणि अधिकाऱ्यांसह संघ दिल्लीहून रवाना होईल. घरगुती खेळाडूंना यापूर्वीच दिल्लीत क्वारंटाईन ठेवण्यात आले आहेत आणि त्यांना एक आठवडा यूएईमध्ये आयसोलेट केले काही. त्यानंतर त्यांचे शिबिर सुरू होईल,” डीसी अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या आठवड्यात चेन्नई आणि मुंबईतील संघ यूएईला पोहोचले होते. आयपीएलचा 14 वा हंगाम भारतात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान बंद दरवाज्यामागे आयोजित करण्यात आला होता, परंतु काही खेळाडू व सहकर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मे महिन्यात स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती.
मे महिन्याच्या सुरुवातीला स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती, तेव्हा 29 सामने खेळले गेले होते. आणि आता उर्वरित 31 सामने यूएईमध्ये होणार आहेत. आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा यूएई येथे 19 सप्टेंबरपासून सुरु होईल. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ होईल. दुबई येथे 13 सामने, 10 शारजाह आणि 8 अबू धाबी येथे आयोजित केले जाणार आहेत. अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.