IPL 2021 Auction मध्ये एमएस धोनी होणार मालामाल, CSK कर्णधार 150 कोटींची कमाई करणारा ठरणार पहिला खेळाडू; विराट कोहली, रोहित शर्मा राहणार मागे
सध्या धोनीचा सीएसके बरोबर केलेला करार तब्बल 15 कोटींचा आहे आणि त्याने आतापर्यंत 137.8 कोटी कमावले आहेत. आयपीएल 2021 मध्ये सीएसके त्याला 15 कोटी रुपये देत रिटेन करणार असल्याने धोनी प्रसिद्ध लीगमधील 150 कोटी रुपयांच्या पगाराचा टप्पा गाठेल.
MS Dhoni IPL Salary 2008-2020: एमएस धोनी (MS Dhoni) इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) पगाराच्या बाबतीत 150 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवणारा पहिला खेळाडू ठरणार आहे. आयपीएल (IPL) 2020 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध अंतिम लीग सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकल्यानंतर सीएसकेचा (CSK) कर्णधार म्हणाला की, तो 2021 च्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जकडून (Chennai Super Kings) खेळणार आहे. शिवाय, आयपीएल 2021 मध्ये धोनी संघाचे नेतृत्व करणार असल्याची सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनी यापूर्वी पुष्टी केली. आयपीएल करिअरमधील सध्या धोनी सर्वाधिक 137 कोटी कमाई करणारा पहिला खेळाडू आहे आणि आता यंदाच्या आयपीएलमध्ये माजी भारतीय कर्णधार आणखी एक मैलाचा दगड गाठण्यासाठी सज्ज आहे. सध्या धोनीचा सीएसके बरोबर केलेला करार तब्बल 15 कोटींचा आहे आणि त्याने आतापर्यंत 137.8 कोटी कमावले आहेत. आयपीएल 2021 मध्ये सीएसके त्याला 15 कोटी रुपये देत रिटेन करणार असल्याने धोनी प्रसिद्ध लीगमधील 150 कोटी रुपयांच्या पगाराचा टप्पा गाठेल. (IPL 2021 Auction: आयपीएल लिलावापूर्वी एमएस धोनीचा CSK संघ या खेळाडूंना करू शकतो रिलीज, एकेवेळी कोटींमध्ये केली होती खरेदी)
आयपीएलच्या पहिल्या लिलावातला सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या धोनीने पहिल्या तीन हंगामात 18 कोटी रुपयांची कमाई केली. बीसीसीआयने रिटेनर रक्कम वाढवल्यानंतर पुढील तीन हंगामात त्याने प्रत्येकी 8.28 कोटी कमावले. 2014 आणि 2015 मध्ये धोनीने दरवर्षी 12.5 कोटींची कमाई केली. रायझिंग पुणे सुपरगिजॅटमध्येही धोनीला इतकेच पैसे दिले गेले होते ज्यामुळे त्याने दोन वर्षांच्या कालावधीत 25 कोटी रुपये कमावले. त्यानंतर, आयपीएल 2018 च्या मेगा-लिलावापूर्वी बीसीसीआयने पुन्हा एकदा रिटेनर रक्कम वाढविली आणि सीएसकेने त्यांच्या कर्णधाराला 15 कोटी रुपये दिले. सीएसकेच्या आयपीएल कमबॅकनंतर त्याने 45 कोटींची कमाई केली आहे. आयपीएल 2021 मध्ये कोणताही मोठा लिलाव होणार नसल्याने यंदाच्या हंगामासाठी त्याला 15 कोटी रुपये देण्यात येतील.
दरम्यान, धोनीच्या मागे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कर्णधार विराट कोहली आहे. रोहित आणि विराटने 13 वर्षाच्या आयपीएल कालावधीत अनुक्रमे 131.6 कोटी आणि 126.2 कोटी रुपये कमावले आहेत. रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा खेळाडू आहे. त्याने आयपीएल कारकीर्दीची सुरुवात डेक्कन चार्जर्सपासून केली होती, पण स्टार फलंदाज 2011 पासून मुंबई इंडियन्सशी संबंधित आहे. दुसरीकडे, आरसीबी कर्णधार विराट आयपीएलचा सर्वाधिक कमाई करणारा तिसरा खेळाडू आहे. विराटला पहिल्या हंगामात 12 लाखात खरेदी केल्यावर आरसीबीने 2020मध्ये त्याला 17 कोटी देत रिटेन केले.