IPL 2021 Sponsor: VIVO साठी पुन्हा उघडणार आयपीएलचे दार, चिनी कंपनी बनू शकते टायटल स्पॉन्सर

शीर्षक प्रायोजकत्व कोणाला मिळेल यावर अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. Cricbuzzच्या वृत्तानुसार, लीगच्या 14 व्या आवृत्ती तसेच आगामी मोसमातील शीर्षक प्रायोजक म्हणून बीसीसीआय VIVO साठी स्पर्धेचे स्पॉन्सर म्हणून दार उघडण्याच्या तयारीत आहे.

IPL Trophy  (Photo Credit: Twitter)

IPL 2021 Title Sponsor: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या लिलावाची उलटी गती सुरु झाली आहे. सर्व आठ फ्रँन्चायझींनी कायम ठेवलेल्या आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी शेअर केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 18 फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये (Chennai) लिलाव आयोजित करण्याचं ठरवलं आहे. शीर्षक प्रायोजकत्व (IPL Sponsorship) कोणाला मिळेल यावर अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. चीन-आधारित स्मार्टफोन ब्रँड, VIVO ने 2018 मध्ये टी-20 लीगच्या पाच हंगामांकरिता दर वर्षी 440 कोटी रुपयांत स्पॉन्सरशिप मिळवली होती. पण, गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात राजकीय पडसादामुळे देशात चीनविरोधी भावना वाढल्या. VIVO वर देखील सर्वांच्या निशाण्यावर आला 2020 चे प्रायोजकत्व म्हणून त्याला माघार घ्यावी लागली. आयपीएल 2021 ची तयारी चालू असताना प्रायोजकत्वाच्या स्थितीबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही. (IPL: लिलावात हिरो पण कामगिरी 'झिरो, संघ मालकांनी या खेळाडूंसाठी दुपटीने मोजले पैसे मात्र मैदनात ठरले फ्लॉप)

Cricbuzzच्या वृत्तानुसार, लीगच्या 14 व्या आवृत्ती तसेच आगामी मोसमातील शीर्षक प्रायोजक म्हणून बीसीसीआय VIVO साठी स्पर्धेचे स्पॉन्सर म्हणून दार उघडण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयने Dream11ला मागील वर्षी 2021 आणि आगामी हंगामात जास्तीत जास्त रक्कमेची बोली लावण्याची संधी दिली होती परंतु 2020 हंगामात दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त देण्यास ते उत्सुक दिसले नाही. आणि सध्या स्थितीकडे पाहता बोर्ड अद्यापही प्रायोजकाच्या शोधात आहे. ज्यामुळे 18 फेब्रुवारी रोजी होणारा लिलाव शीर्षक प्रायोजकच्या अनुपस्थितीत होईल असे दिसत आहे. दरम्यान, VIVO चे पुनरागमन भारत-चीन यांच्यातील राजकीय स्थितीवर अवलंबून आहे मात्र सध्याची स्थिती पाहता चिनी मोबाईल निर्मात्याचे कमबॅक बर्‍यापैकी अवघड दिसत आहे.

VIVO ने माघार घेतल्यामुळे बीसीसीआयच्या कमाईवरही परिणाम झाला आहे. VIVO आयपीएल शीर्षक प्रायोजित म्हणून वर्षाला 440 कोटी रुपये द्यायचे आणि त्यांच्या करार 2022 पर्यंत होता तर बीसीसीआयला Dream11 कडून वर्षाला फक्त 222 कोटी रुपये मिळाले त्यामुळे या बाबतीत बोर्डाला सुमारे 218 कोटींचे नुकसान झाले. सध्या बीसीसीआयचे लक्ष 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मिनी लिलावाकडे आहे ज्यानंतर, शीर्षक प्रायोजकाचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो.