IPL 2021 Auction: अर्जुन तेंडुलकरला खरेदी करण्यामागे काय आहे कारण? पहा काय म्हणाले Mumbai Indians प्रशिक्षक महेला जयवर्धने
आयपीएल 2021 लिलावात अर्जुन तेंडुलकरच्या नावाची उत्सुकतेने प्रतिक्षा होती. अर्जुनचे नाव झळकल्यावर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने अर्जुनला त्याच्या बेस प्राईस 20 लाखांत खरेदी केले. त्याचा समावेश केल्याने नेपोटिझमच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. सचिनच्या उपस्थितीने त्यांना स्टार-लाइन अपमध्ये संधी मिळण्यास मदत केली असे मत बऱ्याच जणांनी व्यक्त केले.
IPL 2021 Auction: कोविड-19 प्रोटोकॉल दरम्यान चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल ((IPL) 2021 लिलावात अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) नावाची उत्सुकतेने प्रतिक्षा होती. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे आणि सय्यद मुश्ताक अली टूर्नामेंट 2020-21 मध्ये मुंबईच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले. अर्जुनच्या कौशल्याशिवाय त्याच्या आडनावानेही चांगलाच चर्चेचा विषय ठरला. लिलावाची सांगता अर्जुनच्या नावाने झाली. अर्जुनचे नाव झळकल्यावर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अर्जुनला त्याच्या बेस प्राईस 20 लाखांत खरेदी केले. अर्जुन पाच वेळा इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) चॅम्पियन्स मुंबई इंडियन्स संघाचा भाग असेल आणि त्याचा समावेश केल्याने नेपोटिझमच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. सचिनच्या उपस्थितीने त्यांना स्टार-लाइन अपमध्ये संधी मिळण्यास मदत केली असे मत बऱ्याच जणांनी व्यक्त केले. (IPL 2021 Auction: आला रे आला! आयपीएलमध्ये Arjun Tendulkar याची एंट्री, 14व्या हंगामात बेस प्राईसवर ‘या’ संघाने केला समावेश)
अशा सर्व दाव्यांवरील प्रतिक्रिया देताना मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी अर्जुनची का निवड केली याबाबत भाष्य केले. “आम्ही त्याकडे पूर्णपणे कौशल्याच्या आधारे पाहिले आहे. म्हणजे सचिनच्या कारणास्तव त्याच्या डोक्यावर एक मोठा टॅग असणार आहे. पण, सुदैवाने तो गोलंदाज आहे, फलंदाज नाही. म्हणून मला वाटते की अर्जुनसारखा गोलंदाजी केल्यास सचिनला खूप अभिमान वाटेल. मला वाटते की ही अर्जुनसाठी शिकण्याची प्रक्रिया असेल आणि त्याने नुकतंच मुंबईकडून खेळायला सुरुवात केली आणि आता फ्रेंचायझी. तो शिकेल आणि विकसित होईल. तो अजूनही तरूण आहे. अतिशय लक्ष केंद्रित करणारा तरुण," ESPNcricinfo ला जयवर्धनेने म्हटले. ते पुढे म्हणाले, "आम्हाला त्याला वेळ द्यावा लागेल आणि आशेनेही की त्याच्यावर एकाही प्रकारचा दबाव आणू नये. फक्त त्याला विकसित होऊ द्या आणि त्याच्या मार्गावर कार्य करू द्या आणि आम्ही त्याला मदत करण्यास तेथे आहोत."
दरम्यान, भारताचा माजी वेगवान वेगवान गोलंदाज आणि एमआयचे क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक झहीर खाननेही जयवर्धनेच्या दाव्यांचे समर्थन केले आणि म्हणाले की, “मी नेटमध्ये बराच वेळ घालवला आहे, त्याला काही युक्त्या शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे. तो एक मेहनती मुलगा आहे. तो शिकण्यास उत्सुक आहे जो की एक रोमांचक भाग आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा होण्याचा अतिरिक्त दबाव त्याच्यावर कायम राहील. त्याला याच्यासोबत जगण्याची गरज आहे. संघाचे वातावरण त्याला मदत करेल, झहीरने लिलावानंतर म्हटले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)