इंडियन प्रीमियर लीग 2021 साठी खेळाडूंच्या लिलावाला चेन्नई येथे सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या सर्व आठ आयपीएल टीम सहभागी होत आगामी 14व्या सीझनसाठी 291 खेळाडूंवर बोली लगावणार आहेत.
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज हनुमा विहारी अनसोल्ड ठरला आहे, तर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन 20 लाखाच्या बेस प्राईसवर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला आहे.
चेन्नई सुपर किंगचा माजी अष्टपैलू केदार जाधवला लिलावाच्या दुसऱ्या फेरीत सनरायझर्स हैदराबादने 2 कोटींच्या बेस प्राईसवर ताफ्यात समावेश केला. दुसरीकडे, त्याचा माजी साथीदार हरभजन सिंहला केकेआर 2 कोटींच्या बेस प्राईसवर संघात सामील केले.
ऑस्ट्रेलियाचा टी -20 क्रिकेट स्पेशालिस्ट डॅनियल ख्रिश्चन याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 4.80 कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेसह गोट्यात समावेश केला आहे. ख्रिस्चन 75 लाख बेस प्राईससह लिलावाच्या मैदानात उतरला होता.
न्यूझीलंड फलंदाज मार्टिन गप्टिल आणि भारतीय गोलंदाज पवन नेगी लिलावाच्या पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरले आहेत. या दोघांना आपल्या ताफ्यात घेण्यास कोणत्याही फ्रँचायजीने रस दाखवला नाही.
दिल्ली कॅपिटल्सने एम सिद्धार्थला 20 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे तर मराठमोळ्या तुषार देशपांडेच्या पदरी निराशा पडली आहे आणि तो अनसोल्ड राहिला आहे. त्याची बेस प्राईज 20 लाख होती.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज Riley Meredith याला पंजाब किंग्सने 8 कोटी रुपयांच्या बोलीमध्ये संघात सामील केले आहे. त्याने 2017 मध्ये पाकिस्तानविरुद्ध दौऱ्यातून लिस्ट ए पदार्पण केले.
तामिळनाडूचा शाहरुख खान 2021 हंगामात पंजाब किंग्सकडून खेळताना दिसेल. 20 लाख बेस प्राईस असलेल्या शाहरुखला पंजाबने 5.25 कोटी रुपयात खरेदी केले. त्याची बेस प्राईज ही एकूण 20 लाख होती.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत शानदार फलंदाजी करणाऱ्या बरोडाच्या विष्णू सोलंकी पहिल्या फेरीत खरेदीदार मिळाला नाही आणि अनसोल्ड राहिला. सोलंकीची बेस प्राईस 20 लाख आहे.
IPL 2021 Auction LIVE Updates: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 साठी खेळाडूंच्या लिलावाला चेन्नई येथे सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या सर्व आठ आयपीएल टीम सहभागी होत आगामी 14व्या सीझनसाठी 291 खेळाडूंवर बोली लगावणार आहेत. मागच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा युएईमध्ये होणार आहे मात्र, यंदा स्पर्धेचे आयोजन भारतामध्ये होण्याची शक्यता आहे. या लिलाव प्रक्रियेत बरेच मोठे खेळाडू सहभागी झाले आहेत, ज्यांच्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यानेही आयपीएलच्या 14व्या सत्रात नोंदणी केली आहे. या व्यतिरिक्त सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, इंग्लंडचा डेविड मलान, जेसन रॉय यांचाही आहेत. टॉम बंटनसह बरेच अनुभवी आणि खेळाडू देखील लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. (IPL 2021 Auction Live Streaming: इंडियन प्रीमियर लीग 14 लिलावाचे TV Telecast फ्री पहा Star Sports आणि Disney+Hotstar वर)
लिलाव यादीत 164 भारतीय, 125 परदेशी आणि सहयोगी देशांतील तीन खेळाडूंना स्थान मिळाले. आज 291 खेळाडूंचे भवितव्य निश्चित होणार आहे. पंजाब किंग्सकडे लिलावासाठी सर्वाधिक 53.20 पैसे शिल्लक आहेत तर लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला सर्वाधिक 13 जागा भरायच्या आहेत. मुंबई इंडियन्स आयपीएलचे गेतविजेते असून स्पर्धेची सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे. अंबानीच्या मालकीच्या मुंबईने 5 वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत तर, चेन्नई सुपर किंग्सने 3 वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे.