IPL 2021 Auction: आला रे आला! आयपीएलमध्ये Arjun Tendulkar याची एंट्री, 14व्या हंगामात बेस प्राईसवर ‘या’ संघाने केला समावेश
आयपीएलच्या यंदाच्या लिलावात अर्जुनने नोंदवणी केली होती आणि लिलावात त्याला कोणता संघ खरेदी करेल यावर सर्वांच्या नजर लागून होत्या. आणि आता युवा अर्जुन पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळताना दिसेल.
IPL 2021 Auction: क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची (Arjun Tendulkar) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) स्टेजवर एंट्री झाली आहे. आयपीएलच्या यंदाच्या लिलावात (IPL Auction) अर्जुनने नोंदवणी केली होती आणि लिलावात त्याला कोणता संघ खरेदी करेल यावर सर्वांच्या नजर लागून होत्या. आणि आता युवा अर्जुन पहिल्यांदा आयपीएलमध्ये (IPL) खेळताना दिसेल. अर्जुन आपल्या करिअरची सुरुवात 5 वेळा आयपीएल विजेते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची जर्सी परिधान करून दिसेल. मुंबई इंडियन्सने अर्जुनला त्याची बेस प्राईस 20 लाखात संघात समावेश केला आहे. 21-वर्षीय अर्जुन पहिल्यांदा लिलावात आला असून त्याने नुकतंच सय्यद मुश्ताक अली टी -20 ट्रॉफी स्पर्धेतून ज्येष्ठ मुंबई संघात पदार्पण केले. 73 व्या पोलिस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेच्या ग्रुप अ च्या दुसर्या फेरीच्या सामन्यात अर्जुनने नुकतंच 31 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या आणि 41 धावा देत तीन विकेटही घेतल्या होत्या. (IPL 2021 Auction: चेतेश्वर पुजारा याचं 7 वर्षानंतर आयपीएलमध्ये कमबॅक, टाळ्यांचा कडकडाट करत केले अभिवादन, पहा Video)
गतविजेत्या मुंबई इंडियन्स अर्जुनसाठी बोली लगावेल अशी सोशल मीडियावर यूजर्समध्ये चर्चा होती. अर्जुन वेगवान गोलंदाजीसह खालच्या फळीत फलंदाजी करण्यातही सक्षम आहे. मुंबईच्या सिनियर टीमसाठी पदार्पण केल्याने यंदाच्या आयपीएल लिलावासाठी अर्जुनने पात्रता मिळवली होती. अर्जुनच्या घरेलू कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर अंडर-19 युवा कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याने इंग्ल्डंमध्ये क्लब क्रिकेट खेळला आहे शिवाय, मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघाचा नेट गोलंदाज म्हणूनही त्याने संघाबरोबर प्रवास केला आहे.
अर्जुन संघात ताजेपणा आणि तारुण्यातील उत्साह आणेल. 21-वर्षीय अर्जुन एक अशी व्यक्ती आहे ज्याला भविष्यासाठी मार्गदर्शन केले जाऊ शकते. गेल्या महिन्यात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत सचिनचा मुलगा अर्जुनने तीन सामन्यांत दोन सामन्यात दोन विकेट घेतल्या. 2018 श्रीलंका दौऱ्यादरम्यान अर्जुन भारत अंडर-19 संघात खेळला आहे.