IPL Auction 2025 Live

IPL 2020: आयपीएलमध्ये महिला सपोर्ट स्टाफचा समावेश करणारी RCB बनली पहिली टीम, नवनीता गौतम यांची मसाज थेरपिस्ट म्हणून नियुक्ती

आरसीबीने नवनीता गौतम यांच्यासोबत मसाज थेरपिस्ट म्हणून करार केला आहे.

(Photo Credits: File Photo)

आगामी इंडिअन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) फ्रँचायझीमध्ये एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. इंडियन प्रीमियर लीग, आयपीएलची (IPL) बेंगलोर फ्रँचायझीने आगामी 13 व्या सत्रासाठी सपोर्ट स्टाफमध्ये महिलेला स्थान देणारी पहिली टीम बनली आहे. आरसीबीने नवनीता गौतम (Navneeta Gautam) यांच्यासोबत मसाज थेरपिस्ट म्हणून करार केला आहे.  आयपीएलच्या इतिहासात असे पहिल्यांदा होणार की एक महिला सपोर्ट स्टाफचा भाग म्हणून स्पर्धेचा भाग होणार आहे. यासह आरसीबीची टीम महिला कर्मचारीला नियुक्त करणारी लीगची पहिली टीम बनली आहे. (IPL 2020 आधी विराट कोहली च्या रॉयल चैलेंजर्स बैंगलोर ला मोठा झटका, 2019 मध्ये ब्रँड व्हॅल्यू त 8 टक्क्यांनी घट)

नवनीत गौतम कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीसाठी हेड फिजिओथेरपिस्ट इवान स्पीचली आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच शंकर बसू यांच्यासह काम करेल. नवनीत संघ तयार करणे, प्रेरणा, सर्व पर्यवेक्षण आणि सर्व वैयक्तिक शारीरिक आजारांशी संबंधित विशिष्ट तंत्राची कार्यक्षमत्यासाठी जबाबदार असेल. नवनितांच्या नियुक्तीबाबत फ्रँचायझीचे चेअरमन संजीव चुडीवाला म्हणाले, 'इतिहासातील या क्षणाचा भाग होण्याचा मला आनंद आहे. आम्ही योग्य दिशेने घेतलेले हे एक पाऊल आहे. बर्‍याच मार्गांनी हा खेळ दूरदूरपर्यंत पसरत आहे."

दरम्यान, कोहलीच्या नेतृत्वाखाली बेंगळुरू संघाने मागील वर्षी आयपीएलमध्ये अत्यंत खराब कामगिरी केली होती. ज्यामुळे ते पॉइंट्स टेबलच्या सर्वात खाली 8 व्या क्रमांकावर राहिले होते. बंगळुरूने 14 पैकी 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. सुरुवातीला बंगळुरूने सलग 5 सामने गमावले होते, ज्यामुळे नंतर त्यांच्यासाठी प्लेऑफमध्ये पोहोचणे अशक्य झाले होते.