Virat Kohli Takes Ice Bath: सराव सत्रानंतर थकवा दूर करण्यासाठी RCB कर्णधार विराट कोहलीने घेतला आइस बाथचा आनंद, पाहा Photo

विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तीन फोटो आहेत. एका फोटोमध्ये विराट नेटमध्ये फलंदाजीचा सराव करीत आहे, तर दुसऱ्यायामध्ये तो सहकारी खेळाडूंबरोबर फुटबॉल खेळत आहे, तर तिसऱ्या फोटोमध्ये बाथटबमध्ये आंघोळ करत आहे.

RCB कर्णधार विराट कोहलीचा आइस बाथ (Photo Credit: Instagram)

सर्व फ्रँचायझी संघ इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्रात तयारी करीत आहेत. सराव सत्रात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (Royal Challengers Bangalore) खेळाडूही जोरदार घाम गाळत आहेत आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सर्वांमध्ये पुढे आहे. या काळात विराटने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की, प्रशिक्षणानंतर तो थकवा कसा दूर करतो. विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तीन फोटो आहेत. एका फोटोमध्ये विराट नेटमध्ये फलंदाजीचा सराव करीत आहे, तर दुसऱ्यायामध्ये तो सहकारी खेळाडूंबरोबर फुटबॉल खेळत आहे, तर तिसऱ्या फोटोमध्ये बाथटबमध्ये आंघोळ करत आहे. हे फोटो शेअर करताना विराटने लिहिले, 'प्रॉपर सेशन + प्रॉपर आर्द्रता + ग्रेट रिकव्हरी = रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर'. आरसीबीची टीम दुबईतील वॉलडॉर्फ अ‍ॅस्टोरिया हॉटेलमध्ये थांबली आहे. (IPL 2020 पूर्वी विराट कोहलीचे जैव-सुरक्षित बबलचा पालन करण्याचे आवाहन, म्हणाला-'दुबईला क्रिकेट खेळण्यासाठी आलो, मजा करण्यासाठी नाही')

आयपीएलचा 13 वा सत्र 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, तर अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. आरसीबीची टीम अद्यापपर्यंत एकही विजेतेपद जिंकू शकली नाही, तर विराट कोहली 2008 पासून बेंगलोरस्थित फ्रेंचायझी संघाशी संबंधित आहे. या मोसमात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झांपा देखील आरसीबीसह सामील झाला आहे. केन रिचर्डसनने माघार घेतल्यावर झांपाला टीममध्ये स्थान देण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

Proper session + proper humidity + great recovery = 😁 @royalchallengersbangalore

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

21 ऑगस्ट रोजी युएईला पोचल्यानंतर विराट कोहलीच्या आरसीबीने त्यांचा 6 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला ज्या दरम्यान खेळाडूंच्या तीन कोरोना टेस्ट केल्या गेल्या. आणि टेस्टचा अहवाल नकारात्मक आल्यावर आरसीबीने सरावास सुरुवात केली. मंगळवारी आरसीबीच्या युट्यूब शो 'बोल्ड डायरीज' वर बोलताना पाच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर कोहलीने सरावासाठी प्रवेश करताना तो खूप घाबरला होता असे म्हणलं, आणि त्याने अपेक्षेप्रमाणे खेळाला मिस केले नसल्याची कबुलीही विराटने दिली. यंदाही आयपीएलमध्ये कोहली आरसीबीचे नेतृत्व करणार आहे ज्यात आरोन फिंच, क्रिस मॉरिस आणि डेल स्टेनसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश झाला आहे. 12 वर्षाच्या इतिहासात आरसीबीने एकदाही आयपीएलचे जेतेपद जिंकलेले नाही, पण यंदा विराट हे चित्र बदलू इच्छित असेल.