IPL 2020 Update: RCBच्या नेट सेशनमध्ये विराट कोहलीने लगावला मास्टर स्ट्रोक, पाहून तुम्ही देखील म्हणाला काय शॉट आहे! (Watch Video)

विराट कोहलीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला ज्यात तो नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. प्रॅक्टिस दरम्यान विराटने एक शानदार मास्टर-स्ट्रोक लगावला आणि विरोधी टीमला चेतावणी दिली की यंदा तो आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या मूडमध्ये आहे. “योग्य क्रिकेट शॉटसारखे काहीही नाही,” कोहलीने व्हिडिओ कॅप्शन दिले.

विराट कोहली (Photo Credit: Instagram)

तब्बल सहा महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यावर इंडियन प्रीमियर लीग 2020साठी (Indian Premier Leageu) सर्व संघ आणि खेळाडू कसून तयारी करत आहे. खेळाडूंनी पुन्हा एकदा हातात बॅट आणि बॉल धरला. आवश्यक क्वारंटाइन आणि कोरोना व्हायरस टेस्टनंतर, खेळाडूंनी मैदानावर सराव करण्यासही सुरवात केली आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) एकमेव संघ आहे ज्यात एकाहुन अधिक दिग्गज खेळाडूंचा आहे. असे असतानाही विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वातील संघाने आजवर एकही आयपीएल जेतेपद जिंकलेलं नाही, पण यंदा मात्र विराट हे चित्र बदलू इच्छित असेल. आणि यासाठी विराट जय्यत तयारी करत आहे. कोहलीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला ज्यात तो नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. प्रॅक्टिस दरम्यान विराटने एक शानदार मास्टर-स्ट्रोक लगावला आणि विरोधी टीमला चेतावणी दिली की यंदा तो आयपीएल (IPL) ट्रॉफी जिंकण्याच्या मूडमध्ये आहे. (Virat Kohli Takes Ice Bath: सराव सत्रानंतर थकवा दूर करण्यासाठी RCB कर्णधार विराट कोहलीने घेतला आइस बाथचा आनंद, पाहा Photo)

“योग्य क्रिकेट शॉटसारखे काहीही नाही,” कोहलीने व्हिडिओ कॅप्शन दिले. शिवाय, आरसीबीने देखील विराटच्या फील्डिंगचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांचा कर्णधार हवेत उडी मारून एक जबरदस्त कॅच पकडताना दिसत आहे. हा व्हिडिओपासून विराटच्या फिटनेसचा अंदाज बांधला जाऊ शकतो. लॉकडाऊनमुळे खेळापासून दूर असलेल्या विराटची फिटनेस बदललेली नाही. तो स्पर्धेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आणि सज्ज आहे. पाहा आरसीबीच्या नेट सेशनमध्ये विराटचा मास्टर-स्ट्रोक

 

View this post on Instagram

 

Another top session last night. 👊😃 @royalchallengersbangalore

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

आरसीबीचा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

We’re running out of things to say at this point, Skip! 👏🏼 #PlayBold #IPL2020 #WeAreChallengers

A post shared by Royal Challengers Bangalore (@royalchallengersbangalore) on

2013 मध्ये कोहलीला फ्रँचायझीचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वात आरसीबीने 2016 मध्ये आतापर्यंत एकदा फायनल गाठले आहे. त्यानंतर ते आजवर अद्याप स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीसाठी पात्र ठरले नाहीत. दरम्यान, आरसीबीच्या त्यांच्या सराव सत्रांमधील सोशल मीडिया पोस्ट्सनुसार एबी डिव्हिलियर्स विकेटकीपिंगला जबाबदारी देण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे, पार्थिव पटेलला प्लेयिंग इलेव्हनच्या बाहेर बसलेला दिसू शकतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now