IPL 2020 Update: मेलबर्न कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने ICC टी-20 वर्ल्ड कप रद्द होण्याची शक्यता, आयपीएल 13 साठी उघडणार विंडो

जर यंदा टी-20 विश्वचषकचे आयोजन रद्द झाल्यास आयपीएलसाठी विंडो उपलब्ध होऊ शकते.

आयपीएल ट्रॉफी, टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी (Photo Credit: Getty/IANS)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकट काळात आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आणि इंडियन प्रीमिअर लीगचे (Indian Premier League) आयोजन यंदा होणार की नाही यावर सध्या क्रिकेट विश्वात चर्चा रंगली आहे. जागतिक महामारीच्या काळात यंदा टी-20 विश्वचषक किंवा आयपीएल यापैकी एकाचे आयोजन केले जाऊ शकते. यापूर्वी, भारतात लॉकडाऊन वाढल्याने आयपीएलचे आयोजन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले, तर टी-20 विश्वचषक यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित होणार आहे. टी-20 वर्ल्डकप रद्द झाल्यास किंवा पुढील वर्षापर्यंत ढकलल्याने यावर्षी आयपीएल होण्याची शक्यता वाढेल. आयसीसीने अद्याप स्पर्धेच्या भविष्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. तथापि, मेलबर्नची (Melbourne) राजधानी असलेल्या व्हिक्टोरियामध्ये (Victoria) कोविड-19 प्रकरणात वाढ झाल्याने टी-20 विश्वचषक रद्द होण्याची शक्यता वाढली आहे. ए-लीग आणि नॅशनल रग्बी लीगने आधीच सर्व सामने मेलबर्नच्या बाहेर हलवले आहेत. (IPL 2008 लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सने विराट कोहलीला का खरेदी केले नाही? आयपीएलचे माजी COO ने सांगितले कारण)

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) टी-20 वर्ल्डकपच्या फायनलसह सात सामन्यांचे आयोजन करणार आहे आणि प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने आयसीसीकडून धोका पत्करण्याची शक्यता कमी आहे. जर यंदा टी-20 विश्वचषकचे आयोजन रद्द झाल्यास आयपीएलसाठी विंडो उपलब्ध होऊ शकते. आयसीसीच्या आजवरच्या विलंब करण्याच्या डावपेचांमुळे टी-20 विश्वचषक पुढे ढकलण्याची घोषणा करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. शिवाय, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील यंदा स्पर्धेचे आयोजन करण्यामध्ये असमर्थ असल्याचे यापूर्वी सांगितले आहे.

दुसरीकडे, झिम्बाब्वेचा ऑगस्ट महिन्यातील ऑस्ट्रेलिया दौराही रद्द करण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) अद्याप आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास तयार नाही हे स्पष्टपणे दर्शवते. त्यामुळे, बहुराष्ट्रीय स्पर्धा घेणे हे आव्हानापेक्षा कमी नाही. आयसीसी आणि सीए टी-20 विश्वचषक स्थगित करेल, ज्यामुळे आयपीएल 2020 ची विंडो उघडली जाईल जर ते भारताच्या परिस्थितीत ते शक्य झाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif