Scott Styris on Suryakumar Yadav: भारतीय संघात स्थान न मिळालेल्या सूर्यकुमार यादवला न्यूझीलंडच्या स्कॉट स्टायरिसची ऑफर

मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवला टीम इंडियाकडून अद्याप संधी मिळाली नसल्याने न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरिसने फलंदाजाला विचारले आहे की, त्याची वेगळ्या संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे का? रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमारच्या मॅच-विंनिंग खेळीनंतर न्यूझीलंडच्या या दिग्गजाने प्रतिक्रिया व्यक्त केली.

सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

Scott Styris on Suryakumar Yadav: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) टीम इंडियाकडून (Team India) अद्याप संधी मिळाली नसल्याने न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरिसने (Scott Styris) फलंदाजाला विचारले आहे की, त्याची वेगळ्या संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे का? बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध (Royal Challengers Bangalore) मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमारच्या मॅच-विंनिंग खेळीनंतर न्यूझीलंडच्या या दिग्गजाने प्रतिक्रिया व्यक्त केली. फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाने केवळ 43 चेंडूत नाबाद 79 धावा फटकावल्या आणि मुंबईला 5 चेंडू शिल्लक असताना 165 चे लक्ष्य मिळवून देण्यास महत्वाची भूमिका बजावली. मुंबईने 37 धावांवर पहिली विकेट गमावल्यावर सूर्यकुमार फलंदाजीसाठी आला. एका टोकाला विकेट्स नियमित अंतराने पडत असताना, आपली क्षमता दाखवत मुंबईचा स्टार अखेरपर्यंत दृढ राहिला. मुंबई इंडियन्सला एका ओव्हरमध्ये तीन धावांची गरज असताना त्याने शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोहम्मद सिराजला चौकार लगावत खेळ संपविला. (MI vs RCB: विराट कोहली चा सूर्यकुमार यादव ला स्लेजिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सने केली कडाडून टिका)

खेळ संपताच स्टायरिसने ट्विटरवर पोस्ट शेअर करत विनोदी अंदाजात फलंदाजाला विचारले की, त्याची दुसऱ्या देशाकडून खेळण्याची आपली इच्छा आहे का? या आठवड्याच्या सुरुवातीला सूर्यकुमार यादवची ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय संघात निवड न झाल्याने त्याला पुन्हा एकदा धक्का बसला.सूर्यकुमार मागील 2-3 वर्षांपासून घरगुती सर्किट आणि आयपीएलमध्ये चांगले काम करत आहे पण अद्याप भारतीय संघात त्याला स्थान मिळवता आले नाही. तथापि, स्टायरिसने फलंदाजाला न्यूझीलंडच्या दिशेने आकर्षित करण्याची संधी दिली आणि लिहिले, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इच्छेपोटी सूर्यकुमार यादव कदाचीत दुसऱ्या देशाकडून खेळण्याचा निर्णय घेऊ शकतो.” स्टायरिसने ट्विटद्वारे सूर्यकुमारला न्यूझीलंड क्रिकेट संघात स्थान ऑफर केल्याचा बर्‍याच जणांनी अंदाज वर्तवला.

दरम्यान, भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सूर्यकुमारची निवड न केल्याने चाहत्यांसह तज्ञांना देखील धक्का बसला आहे. बीसीसीआय निवड समितीच्या सूर्यकुमारची निवड न करण्याच्या निर्णयावर चहुबाजूने टीका होत आहे. सूर्यकुमार मुंबई इंडियन्स संघाचा नियमित सदस्य असून त्याने आजवे खेळल्या 12 सामन्यात 362 धावा केल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif